सारंगखेडा : सारंगखेडा चेतक फेस्टीवलला दिवसेंदिवस रंगत येवू लागली आहे. बुधवारी लुधीयाना पंजाब येथून आलेल्या राजसिंग (22) व सनिसिंग (20) या पंजाब येथील तरूणांनी अश्वावरून आरूढ होवून कला बाजी सादर केली. या कलेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.या तरूणांची दररोज स्टंट बाजी अश्व प्रेमी व पर्यटकांना अनुभवायला मिळेल. हे दोन्ही स्टंट बाज तीन घोडय़ांवर उभे राहतात. हात सोडून कला सादर कतात. तीन घोडे एकाच वेळेस पवळून त्यावर हात सोडून व तिन्ही घोडय़ांवर झोपून धावणा:या घोडय़ांवर कर्तबगारी दाखवतात. हे पाहून अनेकांचा थरकाप होतो. पंजाबहून खास या स्टंट बाजांना बोलाविण्यात आले आहे. हे दोन्ही कलाकार गेल्या नऊ वर्षापासून ही कला सादर करतात. हा चित्त थरारक प्रसंग पाहण्यासाठी अश्व शौकीन व यात्रेकरूंनी बुधवारी घोडे बाजारात गर्दी केली. राजसिंग व सनिसिंग यांनी आजर्पयत नांदेड, फत्तेहगड, मुकसर (पंजाब), सुलतानपूर, हरियाणा आदी भारताच्या विविध ठिकाणी कर्तबगारी दाखविली आहे. ते सारंगखेडा यात्रेचे आकर्षण ठरू पाहत आहे.अगदी बालवयापासून घोडेस्वारी करून वेगवेगळे स्टंटची कर्तबगारी दाखवून ते या साहसी खेळाकडे वळले. या कर्तबगारीत मोठी जोखीम असल्याचे सनिसिंग व राजासिंग सांगतात. शेवटी प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी काम करावे लागते. हे आमचे काम असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.महाराष्ट्र र्पयटन विकास महामंडळ व चेतक फेस्टीवलतर्फे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धा सलग महिनाभर चालणार आहेत. यात सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विशेष कार्यक्रम त्याच बरोबर अश्व स्पर्धा, चाल, नृत्य, रेस आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर नौका विहाराचीदेखील सोय तापी नदीवरील धरणात केली आहे.बुधवारी यात्रेकरून व भाविक, पर्यटकांनी मोफत घोडसवारीचे आयोजन चेतक ग्राऊंडवर करण्यात आले होते. याचा अनेक पर्यटक, यात्रेकरू व भाविकांनी लाभ घेतला. प्रथमच घोडय़ावर बसण्याचा आनंद अश्व सवारीचा आनंद मोठय़ांपासून लहानांर्पयत सर्वजण घेत आहेत. या वर्षी प्रत्यक्ष घोड सवारी करण्याचा अनुभव पर्यटकांना येत असल्याने नक्कीच त्यांची सारंगखेडा वारी सफल झाल्या सारखे वाटत होते. त्याच बरोबर लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. विजेत्या स्पर्धकांना भेट वस्तूही देण्यात येते. यावर्षीचा हा आगळा वेगळा आनंद यात्रेकरूंसाठी पर्यटन विभाग, चेतक फेस्टीवल व एल.जे.एस.ने. पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्याने याचा जास्तीत जास्त फायदा पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केले आहे.लहानांपासून ते मोठय़ांर्पयत प्रत्येकाला सेल्फीचा मोह या फेस्टीवलमध्ये येवून आवरता येत नाही.
‘पंजाबी’ कलाबाजींनी वेधले लक्ष : चेतक फेस्टीवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:46 PM