लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे होणा:या व्हॉईस ऑफ नंदुरबार या कराओके गीत गायन स्पर्धेसाठी पहिली ऑडिशन शहरातील शाळा क्रमांक 1 मध्ये रविवारी सकाळी घेण्यात आली़ यात 40 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला़ 14 जुलै छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात व्हॉईस ऑफ नंदुरबार ही मुख्य स्पर्धा होणार आह़े यासाठी निवड चाचणीचे आयोजन रोटरीतर्फे करण्यात आले आह़े पहिली चाचणी रविवारी घेण्यात आली़ दुसरी चाचणी 30 जून रोजी नगर पालिका शाळा क्रमांक एक येथेच होणार आह़े दरवर्षी होणा:या या स्पर्धेत शहरातून मोठय़ा संख्येने कलावंत सहभागी होतात़ स्पर्धेसाठी 15 वर्षाआतील लहान आणि 15 वर्षावरील मोठा असे दोन गट तयार करण्यात आले आहेत़ स्पर्धकांना चाचणीच्या ठिकाणीही नोंदणी करता येणार आह़े रविवारी झालेल्या या चाचणीप्रसंगी कलावंत व त्यांचे पालक उपस्थित होत़े विविध गीतेसादर करत चिमुकल्यांनी रंगत आणली़ स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोटरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, सचिव प्रितिश बांगड, प्रोजेक्ट चेअरमन नागसेन पेंढारकर यांच्यासह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत़
व्हॉईस ऑफ नंदुरबारसाठी ऑडिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:08 PM