लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापीवरील 22 उपसा सिंचन योजनेच्या 59 गावातील शेतक:यांमध्ये आता पुन्हा नवीन तापीच्या पाण्याची आस लागून आहे. शासनाने विशेष दुरूस्ती कामासाठी मंजूर केलेला निधी व त्याअंतर्गची कामे येत्या तीन महिन्यात पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका:यांनी दिले आहे. दुसरीकडे निर्धारित वेळेत दुरूस्ती झाली नाही तर जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा शेतक:यांनी घेतला आहे. तापीवरील नंदुरबार, शहादा व शिंदखेडा तालुक्यातील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्ती व देखभालीसाठी युती शासनाने 2015 साली मंजुरी दिली होती. त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली होती. परंतु लालफित शाहीचा कारभारामुळे या योजनांच्या दुरूस्तीची गती संथ आहे. परिणामी यंदाच्या दुष्काळात होरपळलेल्या शेतक:यांची सहनशिलता संपली आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला. रविवारी अधिकारी, शेतकरी आणि नेत्यांच्या बैठकीत आता तीन महिन्याच्या आत मंजुर कामे पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्यामुळे शेतक:यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.59 गावांना फायदा22 उपसा सिंचन योजनेचा तापी काठावरील 60 गावांना फायदा होणार आहे. एकुण 14 हजार हेक्टर क्षेत्रावरील जमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे नेहमीच दुष्काळाने होरपळणा:या शेतक:यांना मोठा दिलासा मिळणार आहे. काम पुर्ण करण्याचे नियोजन22 उपसा सिंचन योजनेची कामे पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार काम झाले नाही तर संबधीत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय जे शेतकरी पाईपलाईन दुरूस्ती किंवा वीज खांब टाकण्यासाठी विरोध करतील, कामाला अडथळा आणतील त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिका:यांनी दिले आहे.नियोजनानुसार सिद्धेश्वर, लहान शहादा योजनेचे काम दीड महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. दिपकनाथ, समशेरपूर योजनेचे काम 30 जूनर्पयत. भद्रेश्वर, कोरीट योजनेचे काम 30 जुलैर्पयत, राधाकृष्ण, हाटमोहिदा योजना 15 ऑगस्टर्पयत. विश्वतिर्थ काकर्दे योजना 15 जुलैर्पयत. जनता, कोपर्ली योजना 15 ऑगस्टर्पयत. केदारेश्वर, उत्तर तापी, बिलाडी योजना 15 जूनर्पयत गाळ काढण्यात येईल. देवकीनंदन, शिरूड योजना 15 ऑगस्टर्पयत, हरितक्रांती, पुसनद योजना 15 जूनर्पयत. दत्त, सारंगखेडा योजना 15 जूनर्पयत. गायत्री, कळंबू योजना 30 जुलैर्पयत वीज पुरवठा देणे. रामकृष्ण, कहाटूळ योजना 20 जूनर्पयत वीजेची व 30 जुलैर्पयत सर्व कामे. कामेश्वर, बामखेडा व जयभवानी, निमगुळ योजना 10 जूनर्पयत पंप चाचणी व 15 जूनर्पयत सुरू करणे. दाऊळमंदाणे योजना 15 जुलैर्पयत. रवीकन्या, लोहगाव, भाग्यलक्ष्मी, लंघाणे, विंध्यासनी, धमाणे, कमलाताई, विरदेल या योजना 15 ऑगस्टर्पयत. अक्कडसे-सोनेवाडी योजना 30 जुलैर्पयत तर आशापूरी, पाटण योजना 30 सप्टेंबर्पयत सुरू करण्याचे नियोजन तापी पाटबंधारे व पाटबंधारे विभागाने जिल्हाधिका:यांना दिले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आठ व नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील सहा व शहादा तालुक्यातील आठ अशा एकुण 22 उपसा सिंचन योजनांची विशेष दुरूस्तीची कामे प्रस्तावीत आहेत. योजनांच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यातील 26 गावे.4 शहादा तालुक्यातील 14 व नंदुरबार तालुक्यातील 19 अशा एकुण 59 गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. 4प्रकाशा बॅरेजच्या पाणी साठय़ाद्वारे 29 गावांच्या 7,611 हेक्टर व सारंगखेडा बॅरेजच्या पाणीसाठय़ातून एकुण 30 गावांच्या सहा हजार 802 हेक्टर क्षेत्रास सिंचनाच्या सोई उपलब्ध होतील.
उपसा सिंचन योजनेतील लाभार्थी शेतक:यांनी बेमुदत उपोषणाल सुरुवात केली होती. रखरखत्या उन्हातील उपोषणाला मिळाणारा पाठींबा पहाता प्रशासनाने लागलीच पाऊल उचलले. सर्वसमावेशक बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. रविवार, 2 जून रोजी यासंदर्भात मॅरेथॉन बैठक झाली. त्यात ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यासाठी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. आता निर्धारित वेळेत काम पुर्ण झाले नाही तर 15 ऑगस्टनंतर शेतकरी कधीही तापी पात्रात जलसमाधी आंदोलन सुरू करणार आहेत. तसा निर्वानिचा इशाराच शेतक:यांनी दिला आहे.