लोकमत न्यूज नेटवर्कतळोद : तळोदा व धडगाव या दोन आदिवासी बहुल तालुक्यांना नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणाशी जोडणारा तसेच दोन्ही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणा:या हातोडा पुलाचे काम 30 ऑगस्टर्पयत पूर्ण होणार आह़े अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील पिंगळे यांनी दिली आह़े या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आह़े याबाबत नुकतीच आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुलाची पाहणी करुन आढावा घेतला़ या पुलाचे बांधकामांची माहिती देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अ़ेपी़ चौधरी, उप अभियंता सुनील पिंगळे यांनी सांगितले की, पुलाच्या रोलिंगचे काम आता बाकी असून ते जलद गतीने सुरु आह़े तसेच पुलाला जोडून रस्त्याचे डांबरीकरण व इतर कामे पाऊस सुरु असल्याने खोळंबली होती़ पण आता पाऊस थांबल्याने कामास जलद गतीने सुरुवात झाली आह़े 30 ऑगस्टर्पयत पुलाचे काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितल़े सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुलाचे उदघाटन होऊन हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचीही माहिती या वेळी देण्यात आली आह़े दरम्यान, पुलाचे काम पूर्ण होताच जास्त विलंब न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली़ तळोदा शहर व लगतच्या पसिराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या विषय ठरलेल्या या पुलाचे उदघाटन केव्हा होते या बाबत जनमानसामध्ये कमालीची उत्सुकता आह़े तसेच गेल्या आठवडय़ात अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्ग सदगव्हाण पुलाच्या दुरुस्तीच्या कामांमुळे नाल्याला पाणी येऊन वाहतूक ठप्प झाल्यानंतर हा पुल कधी पूर्ण होतो़ याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आह़े रोज अनेक नागरिक उत्सुकतेपोटी पुलाचे किती काम झाले आहे किती बाकी आहे? हे पाहण्यासाठी सकाळ-संध्याकाळ येत असतात़ हातोडा पुलाचे काम काही वर्षापुर्वी सुरु झाले होत़े त्याला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती़ मागे तापी नदीतील पाणीसाठय़ामुळे वेळोवेळी या पुलाचे काम लांबत गेले होत़े या पुलाचे नऊ पिलर्स व अकरा फाउंडेशन आहेत़ पुलाला 62.50 मीटर लांबीचे 10 स्लॅब असून नंदुबार शहराकडील 15 मीटर व तळोदा शहराकडून 35 मीटर लांबीचा हा पूल आह़े या पुलामुळे तळोदा-नंदुरबार हे अंतर केवळ 20 मिनीटांचे राहणार आह़े या पुलाचे मुदत 2011 मध्ये पूण असतानाही त्याला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली़ लवकरात लवकर वापरासाठी मार्ग खुला करावा 4गेल्या अनेक वर्षापासून हातोडा पुलाच्या उदघाटनाची वाट पाहण्यात येत आह़े परंतु काहीना काही कारणास्तव पुलाचे काम रखडत असून परिणामी वेळेची व पैशांची बचत करणा:या या पुलापासून नागरिकांना वंचित रहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े हातोडा पुलाचे काम 30 रोजीर्पयत जरी पुर्ण करण्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी तोवर काम पूर्ण होईल का असा प्रश्न विचारण्यात येत आह़े त्याच प्रमाणे काम पूर्ण झाल्यावरदेखील उदघाटन कार्यक्रम त्वरीत उरकावा अजून त्यासाठी वेळ लागू नये अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
हातोडा पुलासाठी आता 30 ऑगस्टचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 8:48 PM
काम अंतीम टप्प्यात : पुढील महिन्यात पुलाचे उदघाटन होण्याची माहिती
ठळक मुद्दे भिल्लीस्थानतर्फे आंदोलनाचा इशारा 4भिल्लीस्थान टायगर सेनेतर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हातोडा पुलाचे काम 15 ऑगस्टर्पयत पूर्ण करण्याची मागणी केली़ उदघाटन झाले नाही तर 16 रोजी संघटनेव्दारे ग्रामस्थांना घेऊन सर्व सामान्यांच्या हस्ते पुलाचे उदघ