लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गेल्या दोन दिवसांपूर्वी बोरद शिवारातील गोढाळा येथील शेतात लागलेल्या आगीत भाजलेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत आह़े त्यास पुण्याहून खास ‘बेबी मिल्क’ मागविण्यात आले असल्याची माहिती आह़ेरविवारी गोढाळा येथील उसाच्या शेतात पाचळ जाळण्यासाठी लावलेल्या आगीत बिबटय़ाची दोन बछडी भाजली होती़ त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा भाजला होता़ परंतु आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आह़े उपचारासाठी आल्यादिवसापासून बिबटय़ाच्या बछडय़ाने काहीही खाल्ले नव्हते परंतु मंगळवारी मात्र त्याला गाईचे व नंतर शेळीचे दुध पाजण्यात आल़े दरम्यान, बछडय़ाच्या शेपटीला व पायाला भाजल्यामुळे जखमा झालेल्या आहेत़ परंतु त्यावर औषधोपचार करण्यात येत असल्याने त्या जखमा ब:या होत असल्याचे वैद्यकीय अधिका:यांनी सांगितल़े बछडय़ावर उपचारासाठी पुणे येथूनही विशेष औषधी मागविण्यात आल्या आह़े
बोरद शिवारातील भाजलेल्या बछडय़ाला पुण्याचे ‘बेबी मिल्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 1:24 PM