शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

परतीच्या पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:16 PM

शहादा, नंदुरबार, नवापूरात जोर : पपई, केळी, सोयाबीनसह भातचे नुकसान, घराचे पत्रे उडाली

ठळक मुद्दे रब्बीलाही फटका बसणार.. काही शेतक:यांनी रब्बीची तयारी देखील सुरू केली होती. शहादा तालुक्यातील अनेक भागात रब्बी ज्वारी व हरभरा पेरणी झाली होती. या पावसामुळे अशा शेतक:यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याची शक्यता आहे. खरीप हंगामात देखील पावसाने ताण दिल्य

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परतीच्या पावसाने शनिवारी रात्री शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागाला झोपडून काढले. वादळवा:यासह झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पपई व केळी पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय काढणीवर आलेला मका, सोयाबीन पिकालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात 12 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.जिल्ह्यात घटस्थापनेच्या आदल्या दिवशी मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने पाठ फिरविली होती. ऋुतूमानानुसार सप्टेंबर्पयतच पावसाळा असल्यामुळे अधिकृतरित्या पावसाळा संपल्याची नोंद असली तरी परतीचा पाऊस बाकी होता. ढगांच्या गडगडाटासह पाऊसशनिवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेदरम्यान ढगांच्या गडगडाट व विजांच्या चमचमाटासह पावसाला सुरुवात झाली. शहादा तालुक्याचा काही भाग आणि नंदुरबार तालुक्यात पावसाचा जोर ब:यापैकी होता.  पपई, केळीचे नुकसानसोसाटय़ाचा वारा आणि पावसाचा जोर यामुळे पपई, केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. बोराळे शिवारातील अनेक शेतक:यांच्या पपईचे झाड अध्र्यातून तुटून पडले होते. या परिसरातील सात ते आठ शेतक:यांच्या पपईचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय प्रकाशा शिवारातील केळीचे देखील नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.म्हसावद परिसरात अनिल मुरार पाटील यांच्या म्हसावद शिवारातील शेतातील केळीचे नुकसान झाले. त्यांची 1200 झाडे केळीच्या घडासह कोलमडून पडले. दीपक पाटील यांच्या पपईची 125 झाडे   अपरिपक्व पपईसह कोलमडून पडली. म्हसावद-पिंप्री रस्त्यावर विजेचे खांब व तारा तुटून पडल्या. रायखेड शिवारातील आनंद पाटील यांच्या शेतात केळीची झाडे पुर्णपणे कोसळल्याने सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. परिपक्वझालेले सोयाबीन, मका या पिकांनाही फटका बसला आहे. कापसाचेही देखील मोठे नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यातील हळदाणीसह परिसरात भात आणि उडीद पिकालाही फटका बसला आहे. घराची पत्रे उडालीखेतिया परिसरात वादळी वा:यामुळे अनेक घरांची पत्रे उडाली. पिकांचेही नुकसान झाले. आमदार दिवाणसिंग पटेल, वी.पी.सिंह सोलंकी, मुरली साटोटे, प्रेमसिंह जाधव,नितीन निझरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी      केली.