लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी/म्हसावद : शहादा तालुक्यातील जावदा त.बो. शिवारातील केळीच्या बागेतील 55 ते 60 झाडे कापून नुकसान केल्याची घटना घडली. याबाबत संबंधित शेतक:याने म्हसावद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याच शेताजवळ एका शेतातील कापसाच्या झाडांचेही नुकसान अज्ञात माथेफिरुंनी केले आहे.याबाबत वृत्त असे की, जावदा त.बो. येथील शेतकरी लीलाबाई यादव चौधरी यांच्या मालकीच्या सव्रे नं.5/2 या क्षेत्रात सहा एकर केळीची लागवड केली आहे. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्रशांत यादव चौधरी हे आपल्या शेतातून घरी आले. त्यानंतर पहाटे सहा वाजेच्या सुमारास ते पुन्हा शेतात गेले असता त्यांना शेतातील 55 ते 60 केळी झाडे कापलेली दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. संबंधित शेतक:याचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत चौधरी यांनी ताबडतोब म्हसावद पोलीस स्टेशनला अज्ञात माथेफिरूविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. चौधरी यांच्या शेतालगतच असलेल्या मनोज पदमसिंह गिरासे यांच्या शेतातही 20 ते 25 कापसाची झाडे कापून नुकसान केले आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या परिसरात काढणीवर आलेल्या पिकांची चोरी, केळी, पपई व कापसाच्या झाडांचे नुकसान व शेती साहित्याची चोरी या घटना नेहमीच्याच झाल्या असल्याने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. वारंवार घडणा:या या घटनांबाबत पोलिसांकडे वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही या अज्ञात माथेफिरूंचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा घटनांकडे आता जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका:यांनी गांभीर्याने लक्ष देवून त्वरित या माथेफिरूंचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
केळी व कापूस पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:53 PM