शहादा : रोजंदारीने मिळेल ते काम करून बँकेत पै-पै जमा करणा:या मजुराच्या बचतीवर बँकेनेच पाणी फिरवल्याचा प्रकार घडला आह़े शहादा येथील एका मजुराचे बचत खाते स्टेट बँकेने जनधन योजनेत वर्ग केल्याने त्याच्या व्यवहारांवरच परिणाम झाला आह़े याबाबत बँकेने कागदपत्रे नसल्याचे कारण पुढे केले आह़े शहादा तालुक्यातील शिरुड दिगर येथील फिरोज रज्जाक लोहार व सलमा फिरोज लोहार यांचे बचत खाते शहादा येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत आह़े लोखंडी हत्यारांना धार लावत कुटुंबांचे पालनपोषण फिरोज लोहार करत आहेत़ कुटुंबाला गरजेच्या वेळी मदत व्हावी या हेतूने लोहार दाम्पत्याने बँकेत संयुक्त खाते उघडले होत़े या खात्यावर त्यांच्याकडून वेळावेळी पैसे जमा करून काढण्यात येत होत़े गत आठवडय़ात भावाचा विवाह सोहळा असल्याने बँकेतून पैसे काढण्यासाठी सलमा लोहार ह्या गेल्या असता, त्यांच्या खात्यातून पैसे देण्यास बँकेने नकार दिला़ तसेच तुमचे खाते हे ‘जनधन’ योजनेत असल्याने पैसे आता मिळू शकत नाहीत, असे सांगत बॅँकेने त्यांना परत पाठवल़े यानंतर सलमा लोहार यांनी चौकशी करूनही पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आह़े बँकेत जमा केलेली रक्कमच मिळत नसल्याने लोहार कुटुंबीयांचे हाल सुरू आहेत़ त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करूनही बँक त्यांना पैसे देत नसल्याने अडचणी वाढत आहेत़ (वार्ताहर)
मजुराच्या बचतीवर बँकेने फिरवले पाणी
By admin | Published: February 01, 2017 12:06 AM