लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजचे दरवाजे पूर्ण क्षमतेने बंद करून पाणी अडवण्याचे आदेश असतानाही रात्री-अपरात्री दरवाजे उघडून पाणी सोडण्याचे प्रकार सुरू आहेत़ यामुळे साठलेले पाणी वाहून जात असून शेतक:यांच्या पिकांना पाणी मिळत नाही़ गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची रितसर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतक:यांनी निवेदनाद्वारे केली आह़े सोमवारी हे निवेदन जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांना देऊन शेतकरी शिष्टमंडळाने चर्चा केली़ या निवेदनात शेतक:यांनी म्हटले आहे की, आठ दिवसांपूर्वी प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणी अडवले गेल़े परंतू गेल्या पाच ते सहा दिवसांपासून रात्री बॅरेजचे दरवाजे उघडून साठा केलेले पाणी सोडून देण्यात येत आह़े ऐन खरीप हंगामात अडवलेले पाणी सोडून देण्यात येत असल्याने दुष्काळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ या भागातील बागायतदार क्षेत्रासाठी हे पाणी महत्त्वपूर्ण आह़े रात्री पाणी सोडून देण्यात येत असल्याने शेतक:यांना पाणी उचलणे अशक्य होत आह़े बॅरेजचे पाणी सोडण्यासाठी तांत्रिक परवानगी आणि आदेश गरजेचे असतानाही पाणी सोडण्याचा प्रकार नेमका कोणासाठी होत आह़े याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आह़े तसेच बॅरेजचे संपूर्ण दरवाजे बंद करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतक:यांनी केली आह़े यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, प्रकाशा विकासोचे चेअरमन हरी दत्तू पाटील, राजेंद्र लिमजी चौधरी, अंबालाल नारायण चौधरी, मुकेश नगीन पाटील, गोपाळ चौधरी, तुकाराम परशुराम पाटील यांच्यासह प्रकाशा परिसरातील शेतकरी उपस्थित होत़े
आदेशाविना सोडले जातेय शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:20 AM
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजचे दरवाजे पूर्ण क्षमतेने बंद करून पाणी अडवण्याचे आदेश असतानाही रात्री-अपरात्री दरवाजे उघडून पाणी सोडण्याचे प्रकार सुरू आहेत़ यामुळे साठलेले पाणी वाहून जात असून शेतक:यांच्या पिकांना पाणी मिळत नाही़ गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची रितसर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतक:यांनी ...
ठळक मुद्देआर्थिक व्यवहारांचा आरोप रात्री कोणत्याही प्रकारचे आदेश नसताना पाणी सोडण्याचा हा प्रकार आर्थिक देवाण-घेवाणीतून होत असल्याचा आरोप शेतक:यांनी निवेदनाद्वारे केला आह़े या भागातील व्यावासायिकाला या पाण्याचा सर्वार्थाने उपयोग होण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे