लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीपावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मिरचीची आवकही जेमतेमच आहे. असे असतांना भाव मात्र वाढत नसल्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी आहे. सध्या बाजार समितीत दिवसाला 1800 ते दोन हजार क्विंटल आवक सुरू आहे. जवळपास दिवसाला 100 ते 125 वाहने भरून येत आहेत. मिरचीचे आगार म्हणून नंदुरबार बाजार समिती प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी साधारणत: सव्वा ते पावणेदोन लाख क्विंटल मिरचीची आवक होत असते. हंगाम चांगला राहिला तर दोन अडीच लाख क्विंटलर्पयत देखील आवक झाली आहे. यंदा मात्र अती पावसामुळे मिरचीचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे मिरची हंगामाच्या सुरुवातीलाच आवक कमी झाली. गेल्या काही दिवसांपासून मात्र त्यात सुधारणा होऊन आवक ब:यापैकी वाढली असल्याचे चित्र आहे.दैनंदिन दोन हजार क्विंटलयेथील बाजार समितीत दैनंदिन साधारणत: 1800 ते 2000 क्विंटल आवक होत आहे. 100 ते 125 वाहने भरून मिरची येत आहे. दुपार्पयत सर्वच वाहनांचा लिलाव होत आहे. मिरची हंगाम सुरू झाल्यापासून आवक कमी होती. त्याला कारण पावसाळी वातावरण, वातावरणातील आद्रेत होणारी वाढ यामुळे आवक अपेक्षीतरित्या होत नव्हती. परंतु सध्या वातावरण बदलले असल्याने आणि थंडीही वाढू लागल्याने मिरची आवक 400 ते 500 क्विंटलने वाढली असल्याचे चित्र आहे. सोमवारी बाजारात साधारणत: 19 हजार क्विंटल आवक झाली होती. 23 पथारींवर प्रक्रियामिरची खरेदीनंतर ती सुकविण्यासाठी 23 पथारींवर प्रक्रिया केली जाते. पथारींवर मिरचीचे देठ काढणे, प्रतवारीनुसार ढिग करणे, सुकविण्यासाठी पसरविणे आणि सुकलेली मिरची गोळा करून ती पोत्यांमध्ये भरणे अशा प्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी शेकडो मजूर या ठिकाणी कामाला असतात. त्यांना तीन ते चार महिने ब:यापैकी रोजगार देखील उपलब्ध होतो. तीन ते चार प्रकारबाजार समितीत तीन ते चार जातीच्या मिरच्या विक्रीस येतात. यात व्हीएनआर, लाली, तेजा या प्रमुख मिरचीचे प्रकार सर्वाधिक आहेत. सध्या तेजाचे भाव सर्वाधिक आहेत. तर व्हीएनआर व लाली यांनाही ब:यापैकी भाव मिळत आहेत. असे असले तरी आवक कमी असतांना भाव वाढणे अपेक्षीत असतांना तसे होतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे.
नंदुरबार बाजार समितीत ओली मिरचीला सध्या 1700 ते 3300 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव स्थिर आहे. यंदा उत्पादन आणि क्षेत्र कमी असल्यामुळे भाव जास्त राहण्याची अपेक्षा असतांना तसे होत नसल्याची स्थिती आहे. बाजारात सुकलेल्या मिरचीची आवक देखील ब:यापैकी असते. सुकी मिरचीला पाच हजार ते 15 हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. सर्वाधिक मध्य प्रदेशातून सुकलेली मिरची या ठिकाणी येत आहे. आवक मात्र कमी राहत आहे.