शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

आदिवासी कारखान्याच्या गाळपाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यास पाण्याच्या बाबतीत निसगार्चा वरदहस्त लाभला असल्याने शाश्वत विकास शक्य आहे. शेतक:यांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगतांना ऊस बाहेर नेण्यासाठी प्रय} झाल्यास कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. चेअरमन शिरीष नाईक यांनी उसाचा यंदासाठी दोन हजार 100 रुपये दर जाहीर केला. डोकारे येथील आदिवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यास पाण्याच्या बाबतीत निसगार्चा वरदहस्त लाभला असल्याने शाश्वत विकास शक्य आहे. शेतक:यांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगतांना ऊस बाहेर नेण्यासाठी प्रय} झाल्यास कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. चेअरमन शिरीष नाईक यांनी उसाचा यंदासाठी दोन हजार 100 रुपये दर जाहीर केला. डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या 15 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राजश्री कलशेट्टी व डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुरूपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, सयाबाई नाईक,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी साखर संचालक डी.बी. गावीत, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष सावंत, डोकारे कारखान्याचे व्हाईस चेअरमन सखाराम महाराज, पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, नगराध्यक्षा रेणुका गावीत, पालिकेचे गटनेते गिरीष गावीत, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, कारखान्याचे व्ययस्थापकीय संचालक विजयानंद कुशारे, कारखान्याचे  संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.शाश्वत विकास नेमका काय याचे विवेचन करुन तालुक्यातील शेतक:यांच्या मालकीचा कारखाना असल्याची जाणीव प्रत्येक शेतक:याने ठेऊन सहकायार्ची वागणूक ठेवल्यास शाश्वत विकास साध्य होईल. पारदर्शकता टिकवून ठेवणारा हा कारखाना प्रतिकुल परिस्थितीत चालला ही समाधानाची बाब असून, प्रत्येकाने कारखाना चालावा असे प्रय} करावयास हवे. एकरी उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रय} करा. कारखाना कर्मचारी यांनी शेतक:यांशी सुसंवाद साधून त्यांना नियोजन पटवून द्या अशी सूचना त्यांनी केली. गतवर्षी कारखान्यात 85 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले. जास्त उसाचे गाळप झाल्यास कारखान्यास व पयार्याने शेतकरीवर्गास त्याचा लाभ होतो, असे सांगून चेअरमन शिरीष नाईक यांनी यंदा सव्वादोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप शक्य असल्याने कारखान्याच्या नियोजनानुसार शेतक:यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कारखाना कर्ज मुक्त झाला असून शेतकरी, उस तोड व वाहतूक कामगार, वाहनधारक यांचे कुणाचेही कारखान्याकडे कुठलेही घेणे नाही. शेतक:यांचे पाठबळ मिळाल्यास पावणेदोन लाख मेट्रिक टनाहून जास्त उसाचे गाळप झाल्यास उसासाठी वाढीव दर देण्यात येईल असे ही त्यांनी जाहीर केले. वनांचे जतन नवापूर तालुक्यात झाल्याने पाण्याचे स्त्रोत टिकून आहेत असे सांगून शेतक:यांनी फसगत टाळण्यासाठी इतरत्र उस न देता डोकारे कारखान्यास उस पुरवठा करावा असे आवाहन माणिकराव गावीत यांनी केले. माजी साखर संचालक डी.बी. गावीत यांनी साखर उद्योगातील चक्राची आकडेमोड सहीत माहिती देवून डोकारे कारखान्याच्या धोरण विषयी अवगत करुन दिले. विविध कारखान्यांकडून उसाच्या जाहीर दराची माहिती देवून शेतकरी कसा नाडला जातो व त्यांची फसवणूक  कशी होते याचे विवेचनही त्यांनी केले. प्रास्ताविक कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजयानंद कुशारे यांनी केले. सूत्रसंचलन दिलीप पवार यांनी केले. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व ग्रामपंचायत सदस्य, उस उत्पादक शेतकरीवर्ग तथा कारखान्याचे खातेप्रमुख व कर्मचारी मोठय़ा संख्येने  उपस्थित होते.