शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

क्रांतीची मशाल पेटवीत विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:45 PM

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कअंबरसिंग महाराज साहित्यनगरी (शहादा) : देशातील श्रमिक आणि शोषित समाजाचे साहित्य हे खरे साहित्य आहे . ते पुढे आले पाहिजे त्या साहित्यामुळे देशात क्रांती निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा नजूबाई गावीत यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी लोकशाहीर ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कअंबरसिंग महाराज साहित्यनगरी (शहादा) : देशातील श्रमिक आणि शोषित समाजाचे साहित्य हे खरे साहित्य आहे . ते पुढे आले पाहिजे त्या साहित्यामुळे देशात क्रांती निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा नजूबाई गावीत यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारमंचावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, स्वागताध्यक्ष वाहरू सोनवणे, डॉ.बाबूराव गुरव, संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुवर, अभिनेते राजकुमार तांगडे, जेलसिंग पावरा, प्राचार्य विश्वास सायनाकर, सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेचे के.डी. शिंदे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष विजय मांडके, कार्याध्यक्ष धनाजी गुरव, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक,  जयसिंग माळी, सुनील गायकवाड, प्रसेनजित गायकवाड, कुमार शिराळकर, सदाशिव मकदूम, सुरेश इंद्रजित, प्रमोद नाईक, संजय लोहकरे, सुभाष पाटील, देवीदास शेंडे आदी उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. प्रारंभी शहादा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.  प्रास्ताविक अनिल कुवर यांनी          केले. संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुवर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांचे स्वागत साहित्य सामेलन समितीच्या वतीने करण्यात आले.संमेलनाचे उद्घाटक संजय आवटे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेची निर्मिती करताना लोकशाहीची मूल्ये अधोरेखित केली होती. त्यात ते म्हणाले होते की, शासन              व्यवस्थेला विरोध करणारे विरोधक हवेत, आज मात्र विरोध नावाला आहे. दुसरा मुद्दा सारासार विवेक प्रत्येकाने विवेकाने वागून राज्य घटनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतर संवैधानिक नैतिकता ही  न्याय            यंत्रणेत समानता हवी आज मात्र याउलट स्थिती आहे. न्यायमूर्ती लोया हत्येचा उलगडा झालेला नाही या गंभीर घटनेचा साधा उल्लेख माध्यमांकडे आलेला नाही. लोकशाहीचे चारही मुद्दे धोक्यात आले असताना आपण संविधानाच्या साहाय्याने पुढे जाऊन लढा दिला पाहिजे. आज सत्तेत असलेले             सरकार जर पुढच्यावर्षी निवडून आले तर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत, असे आपण गृहीत धरले पाहिजे. केंद्रातील सरकारकडून दाखवली जाणारी पाकिस्तान आणि मुस्लिमांची भीती व मतांचे जातीतून होणारे ध्रुवीकरण या देशाच्या एकतेला घातक आहे .संमेलनाचे स्वागतध्यक्ष वाहरू सोनवणे यांनी सांगितले की,            शहादा ही फुले, शाहू, आंबेडकर, अंबरसिंग महाराज यांचा वारसा असणारी भूमी आहे. विद्रोह               म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा तोडफोड नव्हे तर विद्रोह           म्हणजे अन्यायाविरोधात केलेले व समता बंधूता माणुसकीच्या लढय़ासाठी केलेले बंड आज सर्वानी धर्माधतेच्या विरोधात लढले पाहिजे. त्याचबरोबर कालबाह्य विचारांना टाकून देण्याची आज गरज निर्माण झाली आहे.या वेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव गौतम कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, देशात सध्या मोठय़ा प्रमाणात धार्मिक उन्माद फोफावला आहे. त्याच्याविरोधात सर्वानी संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे. पुरोगामी म्हणवणा:या महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकरांचा,   गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी व  पत्रकार गौरी लंकेश यांचा खून   झाला. विचार संपविण्यासाठी हे             खून झाले. परंतु माणूस मारून विचार संपत नाहीत. ते विचार अधिक प्रभावीपणाने रुजविण्यासाठी हे संमेलन आहे. या संमेलनात          असणारा तरुण-तरुणींचा सहभाग हा पुरोगामी आणि परिवर्तनवादी तसेच विद्रोही चळवळीसाठी आश्वासक आहे.अभिनेता राजकुमार तांगडे म्हणाले की, आजचा काळ खूप धोकेदायक आहे. राज्य सत्तेच्या विरोधात थोडे जरी बोलले तरी लगेच त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. राजसत्ता हा सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकणारा प्रमुख घटक आहे. त्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. सूत्रसंचालन किरण मोहिते यांनी तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले.