लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : नवापूर तालुक्यातील भादवड येथे गावठाण परिसरात नर्मदा जल सेवा या जलशुद्धी करण संयंत्र युनिटचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदर्श गांव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडले. या सभारंभाला कृषी सहसंचालक अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, सामाजिक दायित्व कंपनीचे प्रतिनिधी व पिरामल सर्वजलचे व्यवस्थापक विनय मेनन, पिरामलचे राज्यस्तरीय अधिकारी अश्वजित ढोके, पिरामलचे विभागीय व्यवस्थापक दीपक कळंकर, जिल्हा प्रकल्प अधिकारी भावेश वाघमारे, नवापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी वर्षा फडोळ, सहाय्यक गट विकास अधिकारी बी.डी. गोसावी, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल रंगारी, अभियान सहयोगी ख्याती मेनङिास, जिल्हा कार्यकारी अधिकारी योगिनी खानोलकर, बायफ संस्थेचे दुधाळे, सरपंच संजय वळवी, सन्मानीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, तलाठी आणि मुख्यमंत्री ग्राम विकास प्रवर्तक अविनाश पाटील आदी उपस्थित होते.पोपटराव पवार व सहका:यांचे गावात आगमन होताच लेझीम व ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत म्हटले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रतिभा वळवी यांनी केले. याप्रसंगी पोपटराव पवार व विनय मेनन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्वजित ढोके तर आभार अविनाश पाटील यांनी मानले.उद्घाटनाप्रसंगी पवार यांनी शुद्ध पाणी पिण्याचे महत्व सांगितले व नर्मदा जल सेवेच्या माध्यमातून मिळणारे पाणी अल्पशा दराने गावाला मिळेल. तसेच महिला बचत गटास रोजगार उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे ग्रामस्थांचे आरोग्यही सुदृढ राहिल असा विश्वास व्यक्त केला. बचत गटाच्या महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले असून, चांगले आरोग्य राखण्यासाठी गावातील लोकांनी शुद्ध पाणी विकत घ्यावे असे, आवाहन ग्रामस्थांना केले.सामाजिक दायित्व या प्रेरणेने पिरामल प्रतिष्ठान अहमदाबाद हे आरोग्य, पिण्याचे पाणी व शिक्षण या निर्देशांकावर कार्यरत आहे. सध्या भारतातील 21 राज्य आणि महाराष्ट्रातील अमरावती, बुलढाणा व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रतिष्ठानचे मानवी निर्देशांक उंचविण्याचे निरंतर कार्य सुरू आहे.भादवडला पिरामल सर्वजलमार्फत महाराष्ट्रातील पहिला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प हा राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व पिरामल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पूजा व दिव्या स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सहाय्याने नर्मदा जल सेवा हे जल शुद्धीकरण संयंत्र कार्यान्वित करण्यात आले. प्रारंभी 15 रूपये प्रति जार दराने शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. या युनिटच्या उभारणीतून महिला बचत गटाच्या 20 महिलांना रोजगार प्राप्त होणार आहे.कार्यक्रमासाठी जि.प.प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापक, बचत गट प्रमुख प्रतिभा वळवी, ग्रामस्थ व युवक-युवती मंडळासह वीज वितरण कंपनीने परिश्रम घेतले.
भादवडला जलशुद्धीकरण संयंत्र युनिट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:59 IST