लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द येथे क्षत्रिय वीरश्री भातीजी महाराज मंदिर परिसरात खासदार निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती प्रकाश कृष्णराव गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. याकामासाठी निधीतून १० लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे़नंदुरबार जिल्ह्यात भातीजी संप्रदायाची संख्या मोठी असून कोठली येथे संप्रदायकडून मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी होत असल्यान खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपयांना मंजूरी देण्यात आली होती़ यातून मंदिर आवारात पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत़ कार्यक्रमास ग्रामविस्तार अधिकारी आऱडी़पवार, महेंद्र वळवी, विलास वळवी, आदी उपस्थित होते़प्रसंगी बोलताना सभापती प्रकाश गावीत यांनी सांगितले की, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे. ग्रामीण भागातील दळणवळणाची साधने, आरोग्य, शिक्षण यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे़ प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन सभापती गावीत यांचा सत्कार करण्यात आला़
भातीजी महाराज मंदिरात भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:24 PM