तळोदा तालुक्यातील धवळी विहीर येथे सोमवारी आरोग्य उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा पार पडला. कार्यक्रमास माजी मंत्री पद्माकर वळवी, सभापती यशवंत ठाकरे, सरपंच दारासिंग पावरा, सरपंच संघटनेचे अध्यक्ष बळीराम पाडवी, भाजपा महिला आघाडीच्या शानूबाई पाडवी, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, ग्रामपंचायत सदस्य सेवाबाई पाडवी, राजकुमार पाडवी, नीलेश वसावे, विजयसिंग पावरा, हिरालाल पावरा, रायसिंग पावरा, जामसिंग पावरा, कांतीलाल पावरा, दारासिंग वसावे, उपअभियंता एस. व्ही. पवार, शाखा अभियंता व्ही. ए. क्षीरसागर, ग्रामसेवक पावरा, वीरसिंग पाडवी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी व आमदार राजेश पाडवी यांनी कुदळ मारून या उपकेंद्राचे भूमिपूजन केले. नागरिकांनी या कामासाठी सहकार्य केले तर लवकरच भव्य इमारत याठिकाणी उभी राहून स्थानिक नागरिकांचा आरोग्याच्या प्रश्न कायमचा मिटण्यास मदत होणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
धवळी विहीर येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:23 AM