गेल्या अनेक दिवसांपासून नवागाव ते आमलाड रस्ता हा नादुरुस्त होता. या दोन किलो मीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. परिणामी वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. याबाबत प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांच्याकडे केली होती. या तक्रारींची दखल घेत जिल्हा वार्षिक योजनेकडील लेखाशीर्ष ३०५४-०३६३ अंतर्गत साधारणतः ३३ लाख रुपये खर्चाच्या या रस्ता कामाला मंजुरी मिळवून दिली. या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, पंचायत समिती सदस्य विक्रम पाडवी, जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाडवी, जितेंद्र पाडवी, मोरवडचे माजी सरपंच प्रवीण वळवी, ग्रामपंचायत सदस्या रश्याबाई वर्ती, कनिष्ठ अभियंता गोसावी, ग्रामसेवक, माजी पंचायत समिती सदस्य शर्मिला पाडवी, गोरख ठाकरे, आमलाड सरपंच सदू पाडवी, भगवान पाडवी, विनोद पाडवी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नवागाव ते आमलाड रस्ता कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:23 AM