लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : पानसेमल व खेतिया परिसरात मागील एक आठवडय़ापासून धुमाकूळ घालणा:या बिबटय़ाला जेरबंद करण्यात मध्य प्रदेश वनविभागाला यश आले आहे. खेतियापासून नजीक असलेल्या भडगोन, ता.पानसेमल येथे शुक्रवारी रात्री हा बिबटय़ा पिंज:यात कैद झाला. दरम्यान, बिबटय़ा पिंज:यात कैद झाल्याने नागरिकांमधील भीतीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले असून परिसरात बिबटय़ांचा अजून वावर असल्याची शंका व्यक्त होत असून त्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठवडाभरापासून पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ाने धुमाकूळ घातला होता. या बिबटय़ाने आठवडाभरात एका युवतीला ठार केले तर तीन जणांना गंभीर जखमी केले होते. या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी मध्य प्रदेश वनविभागाने भडगोन शिवारात पिंजरा ठेवला होता. या पिंज:यात शेळी ठेवलेली होती. शुक्रवारी रात्री बिबटय़ा शिकारीच्या शोधात असताना शेळीची शिकार करण्यासाठी पिंज:यात अडकला आणि कैद झाला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात लक्ष ठेवून होती. बिबटय़ा पिंज:यात कैद झाल्याचे त्यांच्या पहाटे लक्षात आले. या बिबटय़ाला खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वरजवळ असलेल्या नर्मदानगर, ता.पुनासा येथील चांदगढच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले. या वेळी सेंधवा वनविभागाचे डीएफओ केशवसिंह पट्टा, एसडीएफओ विजय गुप्ता, उपवनमंडळ अधिकारी एस.एस. नोरके, पानसेमलचे वनपरिक्षेत्र सहायक प्रदीप पवार, पानसेमल वनमंडळ अधिकारी संजय मालवीय, खेतिया वनपरिक्षेत्र सहायक भुरू खान, खेतिया व पानसेमल वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील, अनिल चौहान, संतोष आलोने, जितेंद्र मुवेल उपस्थित होते.दरम्यान, खेतिया व परिसरात अजूनही बिबटय़ांचा वावर असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. वनविभाग बिबटय़ांना जेरबंद करण्यासाठी सज्ज असून खेतिया व पानसेमल परिसरात किती बिबटे आहेत आणि त्यांचा वावर कुठे आहे यासाठी वनविभाग सतर्क राहून बिबटय़ांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे व ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत. बिबटय़ाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबटय़ाला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी खेतिया व पानसेमल परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. त्यादृष्टीने वनविभागाने सतर्क राहून बिबटय़ाला जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांमधील भीती काही प्रमाणात दूर झाली आहे.
या बिबटय़ाने आठवडाभरात खेतिया व पानसेमल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून एका 17 वर्षीय युवतीला ठार करून तीन जणांना गंभीर जखमी केले होते. 23 जुलै रोजी कानसूल, ता.पानसेमल येथील वृद्ध महिला नायडीबाई सायसिंह ही झोपडीत झोपली होती. त्यांच्यावर बिबटय़ाने हल्ला करून जखमी केले आहे. दुसरी घटना 27 जुलै रोजी भडगोन, ता.पानसेमल शिवारात घडली. निंदणीच्या कामासाठी आलेले मजूर सायंकाळी पाच वाजता घरी परत जात असताना उसाच्या शेतातून येत बिबटय़ाने रस्त्याने जाणा:या संगीता विजय आर्य (17) या युवतीवर बिबटय़ाने मागून येऊन संगीताच्या मानेवर झडप मारून तिला उसाच्या शेतात घेऊन पळाला होता. या घटनेत संगीताचा मृत्यू झाला होता. तिस:या घटनेत 28 जुलै रोजी रात्री आमदा, ता.पानसेमल येथे बिबटय़ाने घराजवळ झोपलेल्या शिवदास पाडवी यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. चौथी घटना 31 जुलै रोजी जुनापानी, ता.पानसेमल येथे घडली. त्यात बरफा रेवा नवरे यांच्यावर बिबटय़ाने हल्ला करून जखमी केले होते. भडगोन शिवारात वनविभागाने ठेवलेल्या पिंज:यात हा बिबटय़ा कैद झाला आहे.