लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने एकत्र येत शिवसेनेला बाजुला सारले. परिणामी सेना सत्तेत असूनही त्यांच्या दोन उमेदवारांचा पराभव झाला. निवडून आलेल्या अभिजीत पाटील व जयश्री पाटील यांना काँग्रेस व भाजपच्या सदस्यांनी मतदान केले.समाजकल्याण समिती सभापतीपदावर रतन खत्र्या पाडवी यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निर्मला सिताराम राऊत, विषय समिती सभापती म्हणून जयश्री दिपक पाटील व अभिजीत मोतिलाल पाटील यांची निवड झाली.जिल्हा परिषद सभापती पदासाठी सोमवारी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. या वेळेत समाज कल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपतर्फे सुरेश सुरुपसिंग गावीत व काँग्रेसतर्फे रतन खत्र्या पाडवी यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून अनुक्रमे धनराज काशिनाथ पाटील व सुभाष दित्या पटले यांनी सही केली.महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपतर्फे अर्चना शरद गावीत, रुचिका प्रविण पाटील व निर्मला सिताराम राऊत यांनी अर्ज दाखल केला. अर्चना गावीत यांच्या अर्जावर राजेश्री गावीत, निर्मला राऊत यांच्या अर्जावर अॅड.सीमा वळवी तर रुचिका पाटील यांच्या अर्जावर शोभा पाटील यांनी सुचक म्हणून सह्या केल्या.विषय समिती सभापतीपदासाठी सहा जणांनी अर्ज दाखल केले. त्यात भाजपतर्फे जयश्री दिपक पाटील, संगीता प्रकाश वळवी यांनी. काँग्रेसतर्फे अजित सुरुपसिंग नाईक, अभिजीत मोतिलाल पाटील, शिवसेनेतर्फे गणेश रुपसिंग पराडके व शंकर आमशा पाडवी यांनी अर्ज दाखल केले होते.दुपारी ३ वाजता पीठासीन अधिकारी दत्तात्रय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेला ५६ पैकी ५५ सदस्य उपस्थित होते. एक सदस्य कपीलदेव चौधरी हे एका गुन्ह्यात जेरबंद असल्यामुळे ते येवू शकले नाही.छाननीत सर्वांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर दहा मिनीटे अर्ज माघारीची मुदत देण्यात आली. या काळात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेल्या अर्चना शरद गावीत, रुचिका पाटील यांनी माघार घेतली. परिणामी निर्मलाबाई सिताराम राऊत या बिनविरोध निवडून आल्या. समाज कल्याण समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेले सुरेश गावीत यांनी अर्ज मागे घेतल्याने रतन खत्र्या पाडवी हे बिनविरोध निवडून आले.विषय समिती सभापतीपदासाठी मात्र मतदान घेण्यात आले. जयश्री दिपक पाटील यांच्या नावाचा पुकारून त्यांना हात उंचावून मतदानाचे आवाहन करण्यात आले. त्यात पाटील यांना ४२ मते मिळाली.अजित सुरुपसिंग नाईक यांना हात उंचावून मतदान करण्याचे आवाहन पीठासीन अधिकारी यांनी केल्यावर त्यांना ५ मते मिळाली. अभिजीत मोतिलाल पाटील यांना ४४, गणेश पराडके यांना ११ तर शंकर आमश्या पाडवी यांना ८ मते मिळाली. परिणामी सर्वाधिक अभिजीत पाटील यांना ४४ तर जयश्री पाटील यांना ४२ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत करण्यात आले.जिल्हा परिषदेत विरोधक आता कोण/पान ४
सभापती निवडीत भाजपलाही संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:45 AM