ऑनलाईन लोकमततळोदा, दि़ 22 : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आदिवासी शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार रेशन न देता कमी धान्य देत आहेत़ त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी लाभार्थी व आदिवासी युवा शक्तीतर्फे करण्यात आली आह़ेयाबाबत तळोदा तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आह़ेत्यात म्हटल्या प्रमाणे, तळोदा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शासनाची स्वस्त धान्य दुकाने चालविण्यात येत आह़े परंतु या दुकानदारांकडून समाजातील गरीब घटकांना 35 किलो धान्य देण्याचा नियम असताना त्याऐवजी कमी धान्य दिले जात आह़े साधारणत 20 किलोच धान्य मिळत असल्याचे आदिवासी शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आह़े या शिवाय बहुतेक दुकानदारांकडे भाव फलक, स्टॉल लावले जात नाहीत़ त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याचेही निवेदनात म्हटले आह़े त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा हा सर्व मनमानी कारभार सुरु असल्याचे लाभाथ्र्याचे म्हणणे आह़े त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी लक्ष देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदव्दारे करण्यात आली आह़े अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आह़ेनिवेदन देताना युवा शक्तीचे अध्यक्ष विनोद वळवी, उपाध्यक्ष विवेक पाडवी, मुकेश ठाकरे, रणजीत पाडवी, सागर पाडवी, चेतन शर्मा, करण पाडवी, प्रेम पाडवी, श्रीकांत पाडवी, योगेश पाडवी, प्रकाश पाडवी,गोविंदा पाडवी, राहुल वळवी, गणेश पाडवी, सोमनाथ पाडवी अजरुन पाडवी आदी उपस्थित होत़े
रेशनच्या धान्यात ‘दाल मे काला’ : तळोदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:14 PM