प्रकाशा : तापी नदीवर येथे नव्याने पूल बांधकामासाठी ब्लास्टींगद्वारे खड्डे खोदले जात असल्याने जवळच असलेल्या बॅरेजला धोका निर्माण झाला आहे. तसेच कोळदा ते सेंधवा दरम्यान सुरू असलेले रस्त्याच्या रुंदीकरण कामांतर्गत प्रकाशाजवळ जोडणारे रस्ते अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे.याबाबत वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रकाशा गावाजवळील तापी नदीवरील जुन्या पुलाजवळ नवीन पुलाचे बांधकामही करण्यात येत आहे. या पुलाच्या कामासाठी तापी नदीपात्रात ब्लास्टींग करून खड्डे खोदण्यात येत आहेत. या ब्लास्टींगमुळे जवळच असलेल्या बॅरेजला धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थ व शेतक:यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच हे काम रात्री 11 ते मध्यरात्रीर्पयत करण्यात येते. ब्लास्टींगमुळे प्रकाशा गावातील घरांचे दारे-खिडक्यांनाही हादरा बसतो. ब्लास्टींगमुळे बॅरेजला धोका निर्माण झाला तर त्याला कोण जबाबदार राहील, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. प्रकाशा बॅरेज प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.जोडरस्ते ठरताहेत अपघातीप्रकाशा गावाजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. मात्र काँक्रिटीरणाचे काम जेथे जेथे झाले आहे त्याठिकाणी जोडणारे रस्ते योग्य नसल्याने अपघात होत आहेत. प्रकाशा-वैजाली चौफुली, बसथांबा चौफुली, मुरारी पेपर मीलजवळ, त:हावद रस्ता, नांदर्डे गावाला जोडणारा रस्ता आदी ठिकाणी जोडणारे रस्ते खाली आहेत. या जोडरस्त्यांना केलेली भर योग्य न झाल्याने रोजच वाहने स्लीप होणे, अवजड वाहने मागे येणे आदींमुळे अपघात होत आहे.रस्त्याचे काम अपूर्णप्रकाशा गावालगत काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. प्रकाशा-तळोदा रस्त्यावर भुवनेश्वरी पेट्रोल पंपाजवळ, प्रकाशा-शहादा रस्तावर रामनगरजवळ, धुरखेडा रस्त्याजवळ काम अपूर्ण आहे. काम अपूर्ण असल्याने याठिकाणी कच्च्या रस्त्यामुळे उडणा:या धुळीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याबाबत याठिकाणी सूचना फलक नसल्याने अपघात होत आहेत.या सर्व समस्यांना कंटाळून प्रकाशा येथील ग्रामस्थ व शेतक:यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 29 ऑक्टोबरपासून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर हरी पाटील, वसंत चौधरी, राजाराम चौधरी, लिंबा चौधरी, शरद पाटील, पुरुषोत्तम पाटील, जगदीश महाजन, नारायण चौधरी, अशोक चौधरी, अनिल भोई, आदींसह शेकडो ग्रामस्थ व शेतक:यांच्या सह्या आहेत.
‘ब्लास्टींग’मुळे प्रकाशा बॅरेजला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:55 AM