प्रकाशा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:00 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहाद्यात अवैध वाळु वाहतूक करणा:या तीन डंपरला मंगळवारी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार मनोज खैरनार यांनी पाठलाग करुन पकडल़े या डंपरना प्रकाशा दुरक्षेत्राला जमा करण्यात आले आह़े प्रकाशातील तापी पुलावर एमएच 15 ईजी 9255, एमएच 39 सी 316 व एमएच 39 सी 734 अशा पकडण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहाद्यात अवैध वाळु वाहतूक करणा:या तीन डंपरला मंगळवारी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार मनोज खैरनार यांनी पाठलाग करुन पकडल़े या डंपरना प्रकाशा दुरक्षेत्राला जमा करण्यात आले आह़ेप्रकाशातील तापी पुलावर एमएच 15 ईजी 9255, एमएच 39 सी 316 व एमएच 39 सी 734 अशा पकडण्यात आलेल्या डंपरचे क्रमांक आहेत़ सायंकाळी ही कारवाई करण्यात आली़ गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाशा येथे अवैध वाळू वाहतूक करण्या:या वाहनांची संख्या मोठय़ा संख्येने वाढली होती़ त्यामुळे यावर चाप बसविण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आह़े मुख्यत गुजरात राज्यातून रोज रात्री शेकडो डंपर महाराष्ट्राच्या हद्दीतून विविध ठिकाणी जात असल्याची माहिती आह़े प्रकाशा येथे गेल्या अनेक दिवसांपासून या अवैध डंपर वाहतुकीची समस्या वाढत होती़ त्यामुळे ही महत्वाची कारवाई आह़े