लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा, वडाळी व कौठळ त.सा. येथे तालुका कृषी अधिका:यांनी सोमवारी पथकासह धाड टाकून महाराष्ट्रात बंदी असलेले आरआरबीटी कापसाचे सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त किमतीचे बोगस बियाणे जप्त केले. या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्री करणा:यांचे धाबे दणाणले आहे. रात्री उशिरार्पयत या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.महाराष्ट्रात आरआरबीटी या कापसाच्या बियाण्याला विक्रीसाठी बंदी आहे. शेजारील गुजरात राज्यातून हे बियाणे आणून महाराष्ट्रात त्याची सर्रास विक्री केली जाते. शेतक:यांनी या बोगस बियाण्याची लागवड करू नये, ते शेतातील मित्र कीडींचा नायनाट करते व यावर फवारल्या जाणा:या तणनाशकामुळे जमिनीत याचा संचार होऊन कॅन्सरसारखा भयंकर आजार होतो. यामुळे या बोगस बियाण्याचा वापर शेतक:यांनी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.सोमवारी हे बोगस बियाणे विक्री करणा:या वडाळी येथील पांडुरंग कृषी सेवा केंद्र व तीन खाजगी बियाणे विक्री करणा:यांवर कारवाई करून सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त किमतीचे बियाणे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी अरुण तायडे, कृषी पर्यवेक्षक निकुंभे व पो.कॉ.गद्रे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी या विक्रेत्यांवर रात्री उशिरार्पयत पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
वडाळी परिसरात बोगस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:09 PM