लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जानेवारी ते मार्च या काळात जिल्ह्यात 117 गावे टंचाईच्या छायेत आहेत़ या गावांना विविध उपाययोजना व्हाव्यात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांनी निधी देऊन टंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आह़े जिल्ह्यात गेल्या काही वर्षात टंचाईयुक्त गावांची यादी वाढत आह़े साधारण जानेवारीपासून निर्माण होणारी पाणीटंचाई ही जुलैर्पयत टिकून रहात असल्याने चिंता वाढत आह़े सरासरीच्या 80 ते 90 टक्के पजर्न्यमान होऊनही भूजल पातळी एक मीटरने खालावल्याचे चित्र तीन वर्षात दिसून आले आह़े यामुळे टंचाईग्रस्त गावांची यादी वाढत आह़े यंदा ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाई भेडसावत होती़ या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने विहिर अधिग्रहण, विंधनविहिरी, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांना मंजूरी दिली आह़े ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत़ जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सातुर्के व काकर्दे ता़ नंदुरबार आणि असलोद ता़ शहादा येथे तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आह़े यासोबत 77 टंचाईग्रस्त गावांमध्ये 13 विंधनविहिरी, 4 खाजगी विहिरींचे अधिग्रहण, दुस:या टप्प्यात 37 तर शेवटच्या तिस:या टप्प्यात 27 विंधनविहिरी तयार करण्यात येणार आहेत़ तृतीय सत्रात धडगाव तालुक्यात दोन नव्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असून नवापूर तालुक्यातील नानगीपाडा व पायरीविहिर या गावांना तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत़ जिल्हा परिषद आदिवासी उपयोजना क्षेत्र विकास योजनेंतर्गत ही कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्हा परिषदेकडून टंचाईग्रस्त गावांकडून आलेल्या प्रस्तावांनंतर निधी देऊन तो पाणीपुरवठा योजनेसाठी खर्च करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े यातून यंदा जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर कामकाज करण्यात येत आह़े टंचाई निवारणासाठी तालुकस्तरीय अधिका:यांनाही टंचाईग्रस्त गावांची माहिती पाठवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ यानुसार पाणीटंचाई असलेल्या गावांचे सव्रेक्षण करून तात्पुरत्या किंवा कायम योजनांसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना ग्रामस्तरावर केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून यंदा 77 गावे टंचाईग्रस्त असल्याचे जाहिर करण्यात आले होत़े यानुसार 88 उपाययोजनांना मंजूरी देण्यात येऊन त्यासाठी निधीलाही मंजूरी देण्यात आली आह़े या निधीतून ही टंचाई निवारणाची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली आह़ेएकीकडे ही कामे प्रगतीपथावर असताना दुसरीकडे धडगाव तालुक्यात गौ:याचा बोदलापाडा व कुंडलचा गुगलमालपाडा येथे टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आह़े एप्रिल पासून सुरू होणा:या टंचाईच्या तिस:या टप्प्यात या दोन्ही गावांमध्ये टँकर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात यंदा केवळ 9 पाडे हे टंचाईच्या विळख्यात असून तेथेही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आह़े
नंदुरबार जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना उपाययोजनांचा बुस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:15 PM