लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या महिनाभरापासून तळोदा शहराजवळील गुजरात हद्दीतील मटावळ-पिंपळास परिसरात अक्षरश: धुमाकूळ घालणा:या बिबटय़ास वनविभागाने बुधवारी रात्री जेरबंद केले आणि शेतकरी व मजूर वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला. जेरबंद बिबटय़ास पाहण्यासाठी गुजरात-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तावली, जि.तापी येथील वनविभागाला ही बातमी कळविल्यानंतर या बिबटय़ास येथून आपल्या कार्यालयात रवानगी केली आहे.अलिकडे मोठय़ा प्रमाणात जंगल नष्ट झाल्यामुळे तेथील वन्य प्राणींचे सपाटीवरील भागात वास्तव्य वाढले आहे. त्यातही तळोदा व कुकरमुंडा तालुक्यातील सीमावर्ती गावांच्या केळी, ऊस, पपईच्या पिकांमध्ये हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. विशेषत: बिबटय़ाचाच जास्त वावर आहे. कारण सद्या या परिसरात नंदुरबार-साक्री तालुक्यातील मेंढपाळ पशुपालकांनी आपल्या शेळ्या-मेंढय़ा चारण्यासाठी इकडे आणल्या आहेत. या पाळीव प्राण्यांनाच हे बिबटे सद्या लक्ष करीत असल्याचे म्हटले जात आहे. सद्या शहराजवळील गुजरात हद्दीतील मटावळ-पिपळास शिवारास बिबट मादी आपल्या तीन पिलांसह मुक्त संचार करीत आहे. शेतावर रखवाली करणारे रखवालदार व मजुरांनाही समोरासमोर बिबट निदर्शनास येत होती. काही वेळेस त्यांच्या पाठलागही केल्याचे मजुरांनी सांगितले. शेळ्या, मेंढय़ा, कुत्रे अशा पाळीव जनावरांवर हल्ला वाढला होता. साहजिकच या हिंस्त्र प्राण्यांच्या वाढत्या संचारामुळे मजूर, रखवालदारांमध्ये प्रचंड भिती पसरली होती. या पाश्र्वभूमिवर मटावळ, पिपळास परिसरातील शेतक:यांनी धुमाकूळ घालणा:या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी गुजरात वन विभागाकडे केली होती.
जेरबंद करण्यात आलेली बिबट मादी आहे. त्यामुळे तिच्याबरोबर दोन बछडे असल्याचे तेथील रहिवाशी सांगतात. कारण ही बिबट मादी आपल्या पिलांसह अनेकांना शेतात, रस्त्यावर नजरेस पडली आहेत. त्यामुळे वनविभागाने त्यांच्या बंदोबस्तासाठी ठिक-ठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. मादीची पिल्ले असल्याबाबत गुजरात वनविभागाच्या अधिका:यांनी दुजोरा दिला आ हे.