बोरद : तळोदा तालुक्यातील कळमसरे मोहिदा शिवारात शनिवारी बिबटय़ाचा बछडा सापडला होता़ सध्या बछडय़ाची प्रकृती उत्तम असून त्याला वनखात्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात येत आह़े बॉईल अंडी, शेळीचे दूध, ग्लुकोज आदींचा पाहुणचार बछडय़ाला देण्यात येत आह़े बिबटय़ाचा बछडा सापडल्यानंतर वनविभागाकडून त्याला रात्री आहे त्याच ठिकाणी ठेवून देण्यात आले होत़े रात्री मादा बिबटय़ा येईल व बछडय़ाला घेऊन जाईल असा अंदाज वनखात्याकडून व्यक्त करण्यात आला होता़ परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही़ बिबटय़ा रात्रभर त्याच ठिकाणी राहिला़ त्यामुळे वनखात्याकडून त्याला सुरक्षित ठिकाणी नेत त्याच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली़ बिबटय़ाची प्रकृती उत्तम असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आह़ेमोहिदा शिवारातील मनोज नरोत्तम पाटील यांच्या उसाच्या शेतात शनिवारी बिबटय़ाचा बछडा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती़ परिसरात बिछडा सापडल्याने नक्कीच बिबटय़ाचा येथे वावर असल्याने ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े बछडय़ाला दुसरीकडे हलवले असते तर, बिबटय़ा चवताळला असता या भितीने बछडय़ाला रात्रभर त्याच ठिकाणी ठेवण्यात आले होत़े तसेच रात्री झाडांवर ट्रॅपींग कॅमेरेही लावण्यात आले होत़े या ठिकाणी वनखात्याचे अधिकारी व कर्मचारीही ठाण मांडून होत़े परंतु रात्रभर वाट पाहिल्यावरसुध्दा बिबटय़ा आपल्या बछडय़ाला घ्यायला आला नसल्याने अखेरीस वनखात्याने सकाळी बछडय़ास दुसरीकडे नेत त्याचा पाहुणचार केला़ तळोदा येथे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी बछडय़ाची तपासणी करुन तो ठणठणीत असल्याचे सांगितल़े दरम्यान, परिसरात अजून बिबटय़ाचे बछडे आहे काय याचा वनविभागाकडून शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े त्यासाठी ग्रामस्थांची मदत घेतली जात आह़े शिवाय झाडांवर ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली़
बिबटय़ाच्या बछडय़ाला बॉईल अंडी व दुधाचा पाहुणचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 3:58 PM