अक्कलकुवा : शहर बसस्थाकाच्या आवारात काटेरी झुडपांमध्ये दीड वर्षे वयाचा बालक बेवारस पद्धतीने आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आह़े कुपोषित असलेल्या या बालकाला पोलीसांच्या मदतीने अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शिवसेनेचे शहरप्रमुख नंदलाल चौधरी हे बसस्थानक परिसरातून जात असताना त्यांना लगतच्या काटेरी झुडपातून लहान बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, त्यांनी याठिकाणी पाहणी केली असता, दीड वर्ष वयाचा बालक दिसून आला़ त्यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलीस सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, हेड कॉन्स्टेबल शशिकांत नाईक, पोलीस कॉन्स्टेबल खुशाल माळी याठिकाणी भेट देत माहिती घेतली़ तसेच त्यांनी बालकाला पोलीस ठाण्यात आणल़े जुजबी कारवाई केल्यानंतर अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालयात या बालकाला दाखल करण्यात आले आह़े याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रताप चाटसे, डॉ़ विवेक बलापुरे, अधिपरिचारिका मिना देसाई, आहार तज्ज्ञ समता खैरनार या बालकावर उपचार करत आहेत़ (वार्ताहर)
बसस्थानकात बेवारस बालक आढळले
By admin | Published: February 02, 2017 1:06 AM