शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नवापूर शहरात धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  शहरातील मंगलदास पार्क परिसरात दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना  बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरीदरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  शहरातील मंगलदास पार्क परिसरात दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना  बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरीदरम्यान एका घरातून निराशा झाल्यानंतर चोरट्यांनी समोरच्या घरात प्रवेश केला होता. याठिकाणी वृद्ध दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवत सुमोर १ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला.मंगलदास पार्क परिसरात  प्रा. जी. एस. पाटील व माजी नगरसेविका तथा प्रा. विजया जडे या दोघा सेवानिवृत्त प्राध्यापकांची घरे समोरासमोर आहेत.  प्रा. विजया जडे या गेल्या एक वर्षापासून हैदराबाद येथे वास्तव्यास असल्याने त्यांचे घर बंद आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी प्रथम त्यांचे घर  फोडून आत प्रवेश केला.  परंतू याठिकाणी त्यांना कोणतीही किमती वस्तू मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान चोरट्यांनी आपला मोर्चा प्रा. जी. एस. पाटील यांच्या घराकडे वळवला.  खिडकीची लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील तळमजल्यावर वयोवृद्ध जोडपे झोपलेले होते. यात  ८५ वर्षीय वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी व कपाटातील मंगळसूत्र असा एक लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. चोरट्यांनी घरात प्रवेश करताना झाडे कापण्यासाठी घराच्या पुढच्या बाजूस ठेवलेला कोयता उचलून घरात खालच्या रूममध्ये असलेल्या वृद्ध दाम्पत्यांना धमकावत दागिने घेऊन गेल्याचे सांगण्यात आले असून, चोरट्यांनी कोणासही इजा पोहोचवली नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. वेळीच गस्त करत असलेल्या पोलीस वाहनाचा सायरन ऐकल्याने चोरट्याने पळ काढला होता. पोलीस गस्त असतांना ही चोरट्यांनी केलेली घरफोडी नवापूर पोलिसांना जणू काही आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. चोरीदरम्यान मराठी बोलणाऱ्या चोरट्यांचा हातात असलेल्या कोयता बघून वृद्ध दाम्पत्यांनी चोरट्यांना प्रतिकार न केल्याने जीवितहानी टळली आहे. प्रत्यक्ष दर्शीने धड-धाकड तीन चोरट्यांपैकी दोन रुमाल बांधून होते, तर एक मराठी भाषा बोलत असल्याचे सांगितले.घटनास्थळी भेट देत पोलिसांनी परिसरातील घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासत माहिती घेतली होती. याबाबत प्रा. जी. एस. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक धीरज महाजन हे घटनेचा तपास करत आहेत.