लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारातील भाज्यांच्या दरात वाढ झाली आह़े त्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजट मात्र कोलमडताना दिसून येत आह़े पाण्याची कमतरता तसेच विपरित हवामानामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेऐन सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर आभाळाला भिडले होत़े सण संपल्यावरही हे चढे दर खाली येण्याचे नाव घेत नाहीत़ कोथंबीर 200 रुपये किलो तर मेथीनेही जवळपास शंभरी गाठली आह़े त्यामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होत आहेत़ भाज्या कडाडल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े शेतक:यांकडून लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्याला पाणी कमी पडल्याने निम्याहुन अधिक पिक वाया गेले आह़े त्यातच उष्णतेतही वाढ झाल्याने जमिनीतील होते नव्हते तेवढेही पाणी सुकल़े परिणामी थंडीच्या काळात भाजीपाल्याचे सर्वसामान्यांना परवडणारे दर आता डोकेदुखी ठरत आहेत़ गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवकही घटली असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़ेभाज्यांचे दर पुढील प्रमाणे (दर किलोत)कोथंबीर 200 रुपये, टमाटा 40 रुपये, अद्रक 60 रुपये, फ्लॉवर 60 रुपये, शिमला मिरची 60 रुपये, कांदा 30 ते 40 रुपये, लसून 50 रुपये, हिरवी मिरची जाड व बारीक 40 ते 50 रुपये, गड्डा 40 रुपये, भेंडी 40 रुपये, वांगे 50 रुपये, गाजर 50 रुपये, पोकळा 50 रुपये, मेथी 70 ते 80 रुपये, लिंबू 40 रुपये, पालक 50 रुपये, गिलके, डोळके 60 रुपये, गंगाफळ 40 ते 50 रुपय़े भाज्यांच्या दरात वाढीची शक्यतागेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात होणारी वाढ येत्या काळात अधिक होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े चांगली थंडी पडल्यास भाज्यांचे दर खाली येऊ शकतात़ परंतु थंडी लांबल्यास भाज्यांच्या दरात याहून अधिक वाढ होण्याची शक्यता या क्षेत्राती जाणकारांकडून वर्तविण्यात येत आह़े सध्या बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी असल्याचे सांगण्यात येत आह़े त्याच प्रमाणे भाज्या महाग असल्याने नागरिकही चिंतेत आहेत़
भाज्यांच्या दरवाढीने बजट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:29 PM
पाण्याअभावी आवकही घटली : सर्वसामान्यांचा खिसा होतोय हलका
ठळक मुद्देफळांच्या दरातही झाली वाढ भाज्यांसोबतच विविध फळांच्या दरातही चांगलीच वाढ झाली आह़े साधारण सफरचंद 100 रुपये तर कश्मिरी व ऑस्ट्रेलियन सफरचंद 150 ते 180 रुपये किलो आहेत़ सिताफळ, मोसंबी 60 रुपये तर दक्षिण अफ्रिकेची मोसंबी 160 रुपये किलो आह़े डाळींब 100 ते 150