लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : दोन लाख रुपये शिलकी रकमेचा अर्थसंकल्प पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. विविध लेखाशिर्षकाखाली तरतुदी करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ व दरवाढ सुचविण्यात आलेली नाही.नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सन 2018-19 च्या अर्थसंकल्पातील अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. सुमारे 24 कोटी रुपये खर्चाच्या अर्थसंकल्पात आरंभीची दोन कोटी 68 लाख 25 हजार 929 रुपये शिल्लक मिळून येत्या आर्थिक वर्षात 21 कोटी 25 लाख 77 हजार रुपये अपेक्षित उत्पन्न मिळून 23 कोटी 94 लाख दोन हजार 929 रुपयांची आवक अपेक्षित आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात 23 कोटी 92 लाख पाच हजार रुपये खर्चाच्या तरतुदी वगळून एक लाख 97 हजार 929 रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे. आठ कोटी पाच लाख दोन हजार रुपये महसुली उत्पन्न तर 11 कोटी 23 लाख रुपये भांडवली उत्पन्न अपेक्षित आहे. पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुल व दैनिक बाजार वसुली तथा जमीन भाडे प्रत्येकी 12 लाख रुपये अपेक्षित आहे. अग्निशमन सेवा निधी 50 हजार व टँकरद्वारे पाणी विक्रीतून 60 हजार रुपये अपेक्षित आहेत.करमणूक कर अनुदान आठ लाख रुपये तर मुद्रांक शुल्क अनुदान 10 लाख रुपये व पालिका सहायक अनुदान चार कोटी एक लाख 55 हजार रुपये अपेक्षित आहे. चौदाव्या वित्त आयोगअंतर्गत चार कोटी, विकास योजना आणि नगरोत्थान आदिवासी उपयोजना अंतर्गत तीन कोटी, नगरोत्थान सर्वसाधारण योजनेवर दोन कोटी, केंद्रीय दलित वस्ती सुधार योजनेत 26 लाख रुपये तर आदिवासी वस्ती सुधार योजनेत एक कोटी रुपये अपेक्षित आहेत.खर्चामधे पाणीपुरवठा व जलशुध्दीकरणासाठी एक कोटी 20 लाख 10 हजार रुपये, आरोग्य सुविधांसाठी एक कोटी 52 लाख 40 हजार रुपये, संकीर्ण खचार्साठी 24 लाख 20 हजार रुपये, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण व सुशोभीकरणासाठी 50 लाख, अग्निशमन सेवेसाठी 13 लाख 20 हजार रुपये, महिला व बालकल्याण तथा दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी सात लाख रुपये, अपंगांसाठी चार लाख 50 हजार रुपये, हिवताप निमरूलनासाठी तीन लाख रुपये, विद्युत साहित्य खरेदी 17 लाख रुपये, विद्युत बिलापोटी 20 लाख रुपये, कर्मचारी गणवेशासाठी 50 हजार रुपये, ई-गव्हर्नन्स देखभाल दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये, उद्यान देखभाल दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये, अमरधाम सुविधेसाठी तीन लाख 50 हजार रुपये व सर्वाधिक तीन कोटी 83 लाख 50 हजार रुपये कर्मचा:यांच्या वेतनावरील खर्च प्रस्तावित करण्यात आले आहे.नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील यांच्यासह उपनगराध्यक्ष अय्युब बलेसरिया, गटनेते गिरीश गावीत, विरोधी गटाचे नेते नरेंद्र नगराळे, बांधकाम सभापती हारुण खाटीक, आरोग्य सभापती विश्वास बडोगे, पाणीपुरवठा समिती सभापती आशिष मावची, महिला व बालकल्याण सभापती सारिका मनिष पाटील, नगरसेवक आरिफभाई बलेसरिया, मंजू मुकेश गावीत, बबिता पाच्या वसावे, विशाल केशव सांगळे, मीनल अमृत लोहार, खलील रज्जाक खाटीक, मंगला विजय सैन, रेणुका विनय गावीत, दर्शन प्रताप पाटील, अरूणा हसमुख पाटील, सविता मनोहर नगराळे, सुरैय्या फारुक शाह, महिमा गावीत यांच्यासह मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, कार्यालय अधीक्षक मिलिंद भामरे, लेखापाल प्रेमानंद गावीत, खातेप्रमुख व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
दोन लाख शिलकीचा अर्थसंकल्प : नवापूर पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:11 PM