लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेती उत्पादन वाढीसाठी शेतकरी यंत्रांचा अधिक वापर करुन लागल्याने पारंपरिक शेतीसाधनांच्या बाजारपेठेला घरघर लागली आह़े परंतू जिल्ह्यात बैल बाजारांच्या बाबतीत याउलट स्थिती असून 2018-19 या वर्षात तीन ठिकाणी भरणा:या बैल बाजारांमधून गेल्या वर्षभरात 25 कोटींची उलाढाल झाली आह़े पारंपरिक शेतीसाठी ओळखल्या जाणा:या नंदुरबार जिल्ह्यात गत 15 वर्षात कृषी यांत्रिकीकरणाचे महत्त्व वाढले आह़े सधन शेतक:यांनी मोठय़ा आणि छोटय़ा ट्रॅक्टरांची खरेदी झाली आह़े मात्र सामान्य शेतकरी बैलांच्या सहाय्यानेच शेती कसत असल्याने पारंपरिक शेतीचे मूल्य टिकून आह़े परिणामी बैलबाजारांमध्ये होणारी उलाढालही कायम असल्याचे जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा आणि अक्कलकुवा येथील बैलबाजारात झालेल्या खरेदी विक्रीतून दिसून आले आह़े 2018-19 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 11 हजार पशुधनाची विक्री ही एकटय़ा तळोदा येथील बैलबाजारातून झाली असून उलाढालीचा आकडा कोटींच्या घरात आह़े त्याखालोखाल अक्कलकुवा येथील बाजारपेठेत 7 कोटी रुपयांच्या पशुधनाची खरेदी विक्री झाली आह़े नंदुरबार बाजारातही वर्षभरात दोन कोटी रुपयांचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आह़े विशेष म्हणजे तिघी बैलबाजारात खरेदी करण्यात आलेल्या बैलांची खरेदी ही शेतक:यांनीच केली आह़े या बाजारांमध्ये फक्त शेतक:यांनाच बैल विक्री करण्याची सक्ती केली जात़े बैलांसोबतच शेळ्या, म्हशी आणि गायींची विक्रीतूनही मोठी उलाढाल झाल्याची माहिती आह़े
जिल्ह्यात बैलांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तळोदा येथे आजअखेरीस 15 हजार बैलांची आवक झाली होती़ यातील 11 हजार 385 बैलांची विक्री होऊन 12 कोटी 45 लाख 88 हजार 200 रुपयांची उलाढाल झाली़ बाजार समितीला 12 लाख 45 हजार रुपयांचा महसूल मिळाला़ याठिकाणी 6 हजार 229 शेळ्यांच्या विक्रीतून 93 लाख रुपयांची उलाढाल झाली़ नंदुरबार कृषी उत्पन्न बाजाराच्या आवारात दर मंगळवारी बैल बाजार भरवण्याची परंपरा आह़े 2018-19 या आर्थिक वर्षात 780 बैलांची आवक झाली होती़ त्यातील 250 बैलांची विक्री होऊन 21 लाख 59 हजार रुपयांची उलाढाल झाली़ बैल बाजार थंडावला असताना 10 हजार 877 शेळ्यांच्या खरेदी-विक्रीतून 2 कोटी 24 लाख 90 हजार रुपयांची उलाढाल झाली़ 93 म्हशींच्या विक्रीतून 37 लाख रुपयांची उलाढाल झाली़4अक्कलकुवा येथे आजअखेरीस 6 हजार 107 बैलांच्या विक्रीतून 5 कोटी 60 लाख 90 हजार रुपयांची उलाढाल झाली़ तळोदा आणि अक्कलकुवा या दोन्ही ठिकाणी किमान एक लाख रुपयांर्पयत बैल जोडय़ा विकल्या गेल्याची माहिती आह़े
जिल्ह्यातील सधन शेतक:यांचा तालुका म्हणून परिचित असलेल्या शहादा बाजार समितीतील बैल बाजारात 10 वर्षापूर्वी मोठी उलाढाल होत होती़ परंतू गेल्या दोन वर्षात येथील व्यवहार पूर्णपणे बंद झाली आह़े पशुधन खरेदी-विक्रीचे किरकोळ व्यवहारही होत नसल्याने येथील उलाढाल पूर्णपणे बंद आह़े परिणामी तालुक्यातील छोटे शेतकरी तळोदा किंवा खेतिया येथून बैल खरेदी करुन आणत असल्याचे चित्र आह़े