लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्गालगत बेडकी शिवारातील टायर जाळून व वापरलेल्या ऑईलपासून डिङोल तयार करण्याच्या कारखान्यामुळे लगतच्या गावातील शेतक:यांच्या जमिनीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. नवापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत बंधारफळी ग्रामपंचायतअंतर्गत बेडकी शिवारात वाहनांचे जुने टायर व वाहनांमधे वापर झाल्यानंतर काढण्यात येणा:या ऑईलपासून डिङोल तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला आहे. नुकताच याच राष्ट्रीय महामार्गावर शहर हद्दीत बेकायदेशीरपणे केमिकलचा वापर करून डांबर बनवण्याचा काळा धंदा उघडकीस आला आहे. बेडकी शिवारात नागरिकांच्या विरोधाला न जुमानता वाहनांमधून काढलेल्या जुन्या ऑईलमध्ये केमिकल टाकून इंधन ऑईल बनवणे व वाहनांचे जुने टायर जाळून ऑईल निर्मिती करणारा कारखाना सुरू असून, या कारखान्यामधून निघणा:या ऑईलमुळे अनेक शेतक:यांच्या कूपनलिकेत ऑईलमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून, जुने टायर जाळले जात असल्याने त्यातून निघणा:या धुरामुळे आणि दरुगधीमुळे नदीलगत असलेल्या वाकीपाडा, करंजी व बेडकी या गावातील नागरिकांना श्वास व दम्यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे, या आशयाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा कारखान्यामुळे 90 टक्के प्रदूषण होत असल्याने गुजरात राज्यात अशा उद्योग उभारणीवर संपूर्ण बंदी असल्याने तेथील व्यापारी आपला उद्योग गुजरात-महाराष्ट्र सीमेवर करीत असल्याचा सूर उमटत आहे. याच कारखान्याच्या विरोधात करंजी खुर्द येथील नागरिकांनी सरपंचांकडे मागणी करून नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेला कारखाना प्रशासनाकडून त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तालुका लोकशाही दिनातही सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी याविषयीची तक्रार दाखल करून नागरिकांच्या जीवाशी खेळणा:या अशा उद्योगांवर कायमची बंदी आणण्याची मागणी केली आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचेही या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रय} झाला आहे.
बेडकी शिवारातील ऑईल कारखान्यामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:02 PM