लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील धामडोद येथून नंदुरबार येथे शिक्षणासाठी येणाऱ्या निम्म्याच विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत असल्याचे समोर आले आहे़ धामडोद बसथांब्यावर बस आल्यानंतर ती फुल्ल असल्याचे सांगून कंडक्टर एकदोन विद्यार्थ्यांना घेऊन बस दामटत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़गुरुवारी हाटमोहिदा ते नंदुरबार ही बस क्रमांक एमएच १४ बीटी २१३९ ही सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान धामडोद बसथांब्यावर आली होती़ याठिकाणी उभ्या असलेल्या काही विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देत उर्वरित विद्यार्थ्यांना वाहकाने जागा नसल्याचे सांगून आत घेतलेच नाही़ साडेअकरा वाजेची बस ही नंदुरबार येथील शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एकमात्र सोय आहे़ ही बस गेल्यानंतर विद्यार्थ्यांना बस नसल्याने त्यांचे हाल झाले़ हे प्रकार गेल्या काही दिवसांपासून नित्याचे झाले असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तातडीने धामडोद सरपंचांची भेट घेत माहिती दिली़ दरम्यान हाटमोहिदाकडून नंदुरबारकडे जाणाºया बसेसची संख्या वाढण्याबाबत वारंवार सांगूनही एसटी महामंडळाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे़ मार्गावरील इतर गावांसाठी स्वतंत्र बस सोडण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांची आहे़
निम्म्याच विद्यार्थ्यांच्या वाट्याला बसप्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:41 PM