शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

टँकर खाक तर बस रस्त्याखाली उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:27 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/नवापूर : चरणमाळ घाटात रसायन भरलेले टँकर उलटून जळाल्याची तर नंदुरबारनजीक नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना  घेवून जाणा:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/नवापूर : चरणमाळ घाटात रसायन भरलेले टँकर उलटून जळाल्याची तर नंदुरबारनजीक नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना  घेवून जाणा:या बसचा अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी घटली. यात किरकोळ जखमी वगळता मोठी जिवीत हानी झाली नाही. चरणमाळ घाटातील वळणावर रसायन भरलेला टँकर उलटल्याने आग लागून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, कालच शिरपूर येथे रसायन कंपनीत स्फोट झाल्यानंतर ही घटना घडल्याने प्रशासनाची काही काळ धावपळ उडाली. नाशिककडून गुजरातकडे रसायन घेवून जाणारा टँकर पिंपळनेर- चरणमाळ रस्त्यावरील चरणमाळ घाटातील अवघड वळणावर उलटला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटल्याची चर्चा आहे. ज्वलनशील रसायन असल्यामुळे टँकरने लागलीच पेट घेतला. या अपघातात जीवीत हानी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर आणि टँकर जळत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अगिAशमन बंब पोहचण्याआधीच टँकर पुर्णपणे जळून खाक झाला होता. सायंकाळी उशीरा घटनेचा पंचनामा करण्यात आला. नवापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. बस रस्त्याखाली उतरलीनंदुरबार तालुक्यातील पथराई पळाशी शिवारातील केडी गावित शाळेजवळ पिकअप व्हॅन ओव्हरटेकच्या नादात गुजरात राज्यातील आनंद येथील रोटरी क्लब ची बस रस्त्याखाली उतरली.या अपघातात नंदुरबारहुन  मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणा:या ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ दुखापत झाली आहे सदर अपघात  रविवारी दुपारी झाला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशीरार्पयत सुरू होते. 

नंदुरबारातून गुजरातमध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी दर महिन्याला अनेक रुग्ण जात असतात. त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था संबधीत आयोजकांकडून करून देण्यात येते. त्यानुसार रविवारी देखील 30 ते 40 जण गुजरातकडे रवाना झाले होते. परंतु नंदुरबारपासून पाच किलोमिटर अंतरावरच त्यांच्या बसला अपघात  झाला. त्यात काहींना किरकोळ जखमा झाल्याने त्यांना पुन्हा घरी नेण्यात आले.