नंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी ता़ नंदुरबार येथील कापूस खरेदी केंद्रावर गेल्या 10 दिवसात केवळ 900 क्विंटल कापूस खरेदी झाला आह़े शेतक:यांच्या अपेक्षेपेक्षा कमी भाव आणि दुष्काळी स्थिती यामुळे कापूस आवक मंदावली आह़े जिल्ह्यात यंदा पावसाने अल्पकाळ हजेरी लावल्याने कापूस उत्पादनावर परिणाम झाला आह़े साधारण 1 लाख 18 हजार हेक्टरवर यंदा कापूस लागवड करण्यात आली होती़ जून-जुलै महिन्यापासून लागवड करण्यात आलेल्या कापसाला योग्य त्या प्रमाणात पाऊस न मिळाल्याने त्याच्या वाढीवर परिणाम झाला होता़ कापसाची वाढ झाल्यानंतर पाऊस न आल्याने झाडावरच्या कै:यांना कापूस फुटलाच नसल्याची स्थिती सर्व ठिकाणी दिसून आली़ यातून एकरी 10 ते 15 क्विंटल उत्पादन येणा:या शेतात यंदा केवळ 1 ते 2 क्विंटल उत्पादन आले आह़े यामुळे गतकाळात दरदिवसाला किमान 1 हजार क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक कापूस आवक होणा:या पळाशी ता़ नंदुरबार येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर यंदा दिवसात 100 क्विंटलर्पयत कापूस आवक होत आह़े उत्पादन घटण्यासोबत शेतकरी खेडा खरेदी करणा:या विनापरवाना व्यापा:यांच्या भूलथापांना बळी पडून कापूस परस्पर विक्री करत असल्याचेही समोर आले आह़े यातून शेतक:यांनी विकलेल्या कापसाची नोंद झालेली नाही़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील खरेदी केंद्रावर 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली होती़ कापसाला 5 हजार 800 रूपयांपेक्षा अधिक दर देण्यात आल़े पहिल्या दिवशी तुरळक सात ते आठ वाहनांमधून कापूस विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता़ परवानाधारक व्यापारी, जिनिंग मिल, सूतगिरण्या यांच्याकडून कापूस खरेदी सुरु असताना शेतक:यांचा भरवसा असलेल्या सीसीआयने अद्यापही कापूस खरेदी सुरुच केलेली नाही़ सीसीआयकडून यंदा कापसाला पाच हजार 450 रुपये प्रतिक्विंटल दर जाहिर करण्यात आला आह़े हे दर कमी असल्याने शेतक:यांमध्ये नाराजी आह़े शेतक:यांचा कापूस खरेदी करून त्याच्या गाठी तयार करण्यासाठी भाडेत्तत्त्वावर जिनिंग मिल घेणा:या सीसीआयला यंदा अडथळ्यांचा सामना करावा लागत आह़े संपूर्ण महाराष्ट्रात सीसीआयकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या जिनिंग मालकांनी भाडे वाढवून मागितल्याने वाद सुरु झाला आह़े हा वाद मिटण्याची शक्यता कमी असल्याने कापूस खरेदी करून त्याच्या गाठी करता येणे शक्य नसल्याने सीसीआय खरेदीत उतरलेले नाहीत़ हमीभावानुसार खरेदी होत नसेल तर व्यावसायिक दरांप्रमाणे सीसीआय त्या-त्या केंद्रांवर कापूस खरेदी करु शकत़े परंतू याकडे संबधितांनी लक्ष दिलेले नसल्याने शेतक:यांचा कापूस हा खाजगी व्यापारी, जिनिंग मिल आणि बाजार समिती खरेदी करत आहेत़ यात शेतक:यांचे नुकसान होत नसले तरी सीसीआयचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले आह़े गेल्या वर्षीही सरकी खरेदीच्या मुद्दय़ावरुन सीसीआय आणि जिनिंग व्यापारी यांच्या दोन महिने वाद सुरु होता़ सीसीआयने गेल्यावर्षी पळाशी येथील खरेदी केंद्रावरुन 4 हजार 250 क्विंटल कापूस खरेदी केला होता़ या कापसाच्या गाठी तयार करण्यासाठी याच परिसरातील जिनिंग मिल भाडय़ाने घेत गाठी तयार करून घेत त्या परराज्यात पाठवून दिल्या होत्या़ यातून त्यांना ब:यापैकी आर्थिक लाभ झाल्याचे सांगण्यात येत आह़े सीसीआयने 8 ते 10 टक्के कापूस हा ओला असल्याने गेल्या 10 दिवसांपूर्वी खरेदीस नकार दिला होता़ आता कापसाचा ओलावा काहीसा कमी झाला असला तरी त्यांच्या जिनिंग मिल नसल्याने त्यांच्याकडून कापूस खरेदी करणे शक्य नसल्याने येथील व्यापा:यांकडून सांगण्यात येत आह़े ओलावा असलेला कापूस व्यापा:यांनी खरेदी केला होता़
पळाशी केंद्रात 10 दिवसात 900 क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:05 PM