लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : ऑनलाईन नोंदणी व चुकारे वेळेवर न मिळणे यासह इतर झंझटमुळे शेतक:यांनी यंदा तूर खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नंदुरबार केंद्रात नवापूर व अक्कलकुवा तालुके जोडून देखील महिनाभरात अवघी 500 क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. अशीच स्थिती शहादा खरेदी केंद्राची देखील आहे. तूरचे कवित्व संपत नाही तोच आता शासनाने हरभरा खरेदी केंद्र देखील सुरू करण्याचा घाट घातला आहे.यंदा तुरीचे उत्पादन लक्षात घेता शासनाने एकाधिकार खरेदी केंद्र सुरू केले. जिल्ह्यात नंदुरबार व शहादा येथे केंद्र सुरू झाले. नंदुरबार केंद्राला नवापूर व अक्कलकुवा हे तालुके तर शहादा केंद्राला तळोदा व धडगाव हे तालुके जोडण्यात आले आहेत. एकाधिकार खरेदी केंद्रात तुरला पाच हजार 450 रुपये भाव जाहीर झालेला आहे. केंद्रात शुकशुकाटमोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रांना शेतक:यांनी प्रतिसादच दिलेला नसल्याचे चित्र आहे. वास्तविक एका केंद्राला तीन तालुके जोडण्यात आल्यामुळे विक्रीसाठी शेतक:यांच्या रांगा लागतील अशी शक्यता होती. परंतु खरेदी केंद्रांकडे कुणी फिरकतही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिनाभरात अवघी 499 क्विंटल तूर खरेदी झाली आहे.किचकट प्रक्रियाएकाधिकार खरेदी केंद्रात शेतक:याला तूर विक्री करावयाची असल्यास ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सातबारा उतारा, बँकेचे पासबूक आणि आधार कार्ड सक्तीचा करण्यात आला होता. नोंदणीनंतर दिवसाला केवळ 25 क्विंटलच तूर खरेदी करण्याची मर्यादा होती. परिणामी एका शेतक:याला केवळ तीन क्विंटल तूर विक्री करता येत आहे. परिणामी जास्तीच्या विक्रीसाठी दोन ते तीन फे:या माराव्या लागणार होत्या. वाहतूक खर्च परवडणारा नसल्यामुळे शेतक:यांनी मग अशा केंद्रांकडे पाठ फिरवणेच सोयीचे ठरविले.चुकारेही विलंबानेज्या शेतक:यांनी महिनाभरापूर्वी तूर विक्री केली आहे त्या शेतक:यांचे चुकारे अजूनही मिळालेले नाहीत. ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया असल्यामुळे परस्पर बँक खात्यात चुका:यांची रक्कम जमा होईल असे सांगण्यात येत असल्यामुळे शेतकरी बँकांचा चकरा मारत आहेत.एकठोक विक्रीकडे कलयंदा शेतक:यांचा एकठोक विक्रीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. यंदा पजर्न्यमान चांगले राहिल्याने जवळपास तुरीचे क्षेत्र यंदा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढले होते. सरासरी क्षेत्र 15 हजार हेक्टर्पयत आहे. परंतु दरवर्षी 12 ते 14 हजार हेक्टर्पयत क्षेत्र असते. यंदा ते 16 हजार 400 हेक्टर्पयत गेले होते. एकटय़ा नवापूर तालुक्यात तब्बल आठ हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते. गेल्या तीन ते चार वर्षापासून तुरीला मोठय़ा प्रमाणावर भाव मिळत असल्यामुळे यंदा क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात आले. यंदा पजर्न्यमान चांगली राहिल्याने उत्पादनही चांगले मिळाले.शहादा-दोंडाईचा वाहतूकशहादा येथे तूर साठविण्यासाठी जागाच नसल्यामुळे शहादा येथे खरेदी करण्यात येणारी तूर ही दोंडाईचा येथील शासकीय गुदामात ठेवण्यासाठी पाठविली जाते. परंतु यंदा खरेदीच कमी असल्यामुळे फारशी वाहतूक होऊ शकली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हरभरा खरेदीहरभ:याची देखील एकाधिकार योजनेअंतर्गत खरेदी केंद्र सुरू करण्याचा सुचना पणन विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. अद्याप एकाधिकार खरेदीचा भाव किंवा केंद्र कधी सुरू होणार याबाबत स्पष्ट झालेले नाही.
नंदुरबार केंद्रात अवघी 500 क्विंटल तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:13 PM