नंदुरबार : पालिका सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा आताशी कुठे बसला असतांना पुन्हा प्रभाग 16 अ च्या पोटनिवडणुकीमुळे धुराळा आणखी उडणार आहे. उद्या, मंगळवार 19 जूनपासून नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. त्याआधीच पालिकेतील कथीत भ्रष्टाचाराचे प्रकरण पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे महिनाभर राजकीय वातावरण गरम राहणार असल्याचे स्पष्ट आहे.नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पालिका निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप गाजले होते. निवडणुकीची राजकीय धग, सत्ता स्थापनेनंतर देखील अर्थात दोन महिन्यापूर्वीर्पयत कायम होती. पालिका सभेतील हाणामारी हे त्याचेच द्योतक होती. त्यानंतर वरवर शांतता दिसून येत असतांना आता पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढणार आहे.रिक्त जागाप्रभाग 16 अ मधून प्रवीण मक्कन चौधरी हे तर याच प्रभागाच्या ब जागेवरून त्यांच्या प}ी रेखाबाई प्रवीण चौधरी निवडून आल्या होत्या. सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागातील लढत विशेष गाजली होती. त्यामुळे प्रवीण चौधरी हे नाव पुन्हा चर्चेत आले होते. परंतु दुर्दैवाने निवडणुकीनंतर दोनच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. परिणामी ही जागा रिक्त झाली. शहरातील राजकीय वतरूळात हा मोठा धक्का होता. आता त्याच जागेवर निवडणूक आहे.उद्यापासून अर्ज भरणारपालिका पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, 19 जूनपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. 25 जूनर्पयत अर्ज दाखल करता येणार आहेत. सध्या शिक्षक मतदारसंघाची राजकीय धुमाळी सुरू असतांना त्यातच आता पालिका पोटनिवडणुकीची घोषणा झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी 26 जून रोजी करण्यात येणार आहे.राजकीय प्राबल्यप्रभाग क्रमांक 16 मध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे अर्थात प्रवीण चौधरी यांचे राजकीय प्राबल्य होते. त्यामुळेच दोन्ही पती-प}ी हे तब्बल साडेसहा हजारापेक्षा अधीक मताधिक्यांनी विजयी झाले होते. त्यामुळे या प्रभागात त्यांचेच प्राबल्य कायम राहील किंवा कसे याकडेही लक्ष राहणार आहे. उमेदवारीकडे लक्षदोन्ही पक्षातर्फे उमेदवारी कुणाला दिली जाते यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. काँग्रेसतर्फे योगेश चौधरी यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपतर्फे स्व.प्रवीण चौधरी यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते किंवा आणखी दुसरा कोणी उमेदवार दिला जातो याकडे लक्ष लागून आहे. दोन्ही पक्षांनी यापूर्वीच उमेदवारांची चाचपणी करून जवळपास नावे निश्चित करून ठेवले आहेत. आता केवळ घोषणेची औपचारिकता राहणार आहे. 25 जूनर्पयत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे 24 किंवा 25 जून रोजी दोन्ही पक्षातील प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करतील असा अंदाज आहे.भर पावसात प्रचारभर पावसाळ्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे पावसातच प्रचार करावा लागणार आहे. मतदान 15 जुलै रोजी होणार आहे. 25 जूननंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीत झालेल्या अटीतटीचा प्रचार लक्षात घेता या पोटनिवडणुकीत देखील अतीतटीचा प्रचार रंगेल अशी शक्यता आहे. त्यामुळे भर पावसातच दोन्ही पक्ष आणि उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे.प्रशासनाचीही तयारीप्रशासनाने देखील यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रारूप मतदार याद्या तयार करून त्यावर हरकती घेणे, अंतिम मतदार यादी तयार करून ती प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. आता निवडणूक निर्णय अधिकारी, सहा.अधिकारी यांची नेमणूक करून 19 जूनपासून प्रत्यक्षात निवडणुकीच्या कामाला सुरुवात होणार आहे.शहाद्यात भर दिवसा घरफोडीतिस:यांदा प्रकार : तीन लाख लंपास, भितीचे वातावरणलोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील दशरथ नगर मधील रविंद्र अहिरे यांच्या घरी भर दिवसा घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरटय़ांनी तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सायंकाळी उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस सूत्रांनुसार, दोंडाईचा रोडवरील फॉरेस्ट ऑफीस समोरील दशरथ नगरमध्ये रविंद्र सुखदेव अहिरे प्राथमिक शिक्षक आपल्या कुटुंबासह राहतात . रविंद्र अहिरे यांची पतपेढीची मिटींग होती व दुपारुन मित्राकडे जेवण असल्याने कुटुंबासह ते मित्राकडे गेले होते. मुलगा घरीच होता तो दुपारी 12 वाजेचा सुमारास घरातुन बाहेर पडला. दोन वाजता अहिरे कुटुंब घरी आले असता त्याना घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेल्या अवस्थेत दिसला. चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले. कपाटात ठेवलेली रोख एक लाख 80 हजार व दीड लाख रुपये किंमतीच्या पाच तोळे सोन्याचा बांगड्या चोरटय़ांनी लंपास केल्या. चोरटय़ांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला घराचा आतुन दरवाजा लावुन घेतला व मागच्या दाराने पसार झाले व मागचा दाराची कडी देखील बाहेरुन लावली. अहिरे दाम्पत्याने मुलाच्या शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दीड लाख रुपये आणले होते. सोमवारी ते शुल्क भरण्यासाठी जाणार होते. रविंद्र अहिरे यांच्याकडे चोरीची ही तिसरी घटना आहे. सायंकाळी उशीरापयर्ंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
नंदुरबारात मंगळवारपासून पोटनिवडणुकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:49 PM