शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

32 ग्रामपंचायतीत रंगणार पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:20 PM

रणधुमाळी : पाच तालुक्यातील रिक्त पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केला आह़े कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूका होणार असून सदस्यपदाच्या 35 रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आह़े जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये या निवडणूका होणार असून 27 एप्रिल पासून तालुकास्तरावर निवडणूकीची अधिसूचना काढण्यात येणार आह़े कार्यक्रमात 7 ते 12 मे या काळात नामनिर्देशनपत्रे मागवणे, 14 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे, 16 मे रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेणे तसेच त्याच दिवशी दुपारी 3 वाजेपासून निवडणूक चिन्ह देऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आह़े यानंतर तब्बल 9 दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू राहणार असून त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार यांच्या सूचनेनुसार 27 मे रोजी सकाळी 7़30 ते सायंकाळी 5़30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आह़े मतदान प्रक्रियेनंतर अधिका:यांच्या सूचनेनुसार 28 मे रोजी तहसील कार्यालयांच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आह़े निकाल तात्काळ जाहिर करण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक कक्षाकडून कळवण्यात आले आह़े जाहिर झालेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार शहादा तालुक्यातील पाडळदा बुद्रुक, कमरावद, बिलाडी त़सा, बुपकरी, श्रीखेड, भोरटेक, दामळदा, मलोणी, कुढावद, सावळदा, कु:हावद त़सा, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काकर्दे दिगर, आकसपूर, शिरूड दिगर या 18 गावांच्या ग्रामंचायतीत पोटनिवडणूक कार्यक्रम राबवला जाईल़ नंदुरबार तालुक्यातील करणखेडा, कोठडे, भोणे, वाघशेपा, धीरजगाव, वावद, नाशिंद़े तळोदा तालुक्यात कढेल, त:हावद, सोमावल खुर्द़ नवापूर तालुक्यात ढोंग, नानगीपाडा, वडखुट तर अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबार या एकमेव ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आह़े सर्व 32 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक याद्यांची छाननी यापूर्वीच करण्यात आल्याची माहिती आह़े त्या-त्या गावात रंगणा:या प्रभागनिहाय निवडणूकांमुळे गावा-गावातील राजकारण तापणार असल्याचे सांगण्यात येत आह़े शहादा तालुक्यातील सर्वाधिक 18 गावांमध्ये पोटनिवडणूक होणार असल्याने उत्सुकता लागून आह़े