ऑनलाईन लोकमत शहादा, जि.नंदुरबार, दि.3 - विजेची चोरी व गळती रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणा:या ‘महावितरण आपल्या दारी’ या अभियानांतर्गत अल्पदरात वीज जोडणीचा शुभारंभ येथे करण्यात आला. अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकृदृष्टय़ा दुर्बल घटकातील कुटुंबांना अल्पदराज वीज जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता राजेंद्र चव्हाण यांनी दिली. आकडे टाकून वीज चोरी होत असल्याने रोहित्रावर भार पडून ते जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीचे होणारे आर्थिक नुकसान व जिवीतहानी टाळण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक संजीव गुप्ता व औरंगाबाद विभागाचे सचिव ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागात प्रथमच ‘महावितरण आपल्या दारी’ या अभियानांतर्गत अल्पदरात वीज जोडणीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहादा उपविभागातील सर्व तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत असून पहिल्याच दिवशी धडगाव येथे 42 ग्राहकांनी वीज जोडणी केली. तळोदा येथे 51, सुलतानपूर 55 तर मंदाणे येथे 30 ग्राहकांनी वीज जोडणी करून घेतली.
वीज चोरी व गळती रोखण्यासाठी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 5:39 PM
महावितरण आपल्या दारी अभियान : शहादा उपविभागात शुभारंभ
ठळक मुद्देशहादा उपविभागातील सर्व तालुक्यात हे अभियान पहिल्याच दिवशी धडगाव येथे 42 ग्राहकांनी वीज जोडणी केली. तळोदा येथे 51, सुलतानपूर 55 तर मंदाणे येथे 30 ग्राहकांनी वीज जोडणी‘महावितरण आपल्या दारी’ या अभियानांतर्गत अल्पदरात वीज जोडणीचा उपक्रम