संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बदलती जीवनशैली, फास्टफूड आणि इतर कारणांमुळे जिल्ह्यासह खान्देशात कॅन्सरचा विळखा वाढत आह़े 2013 ते 20 मार्च 2018 दरम्यान नंदुरबारसह धुळे व जळगाव जिल्ह्यात 19 हजार 736 कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी तीन हजार 81 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आह़ेखान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षापासून मोठय़ा प्रमाणात कॅन्सरचा विळखा वाढत आह़े कॅन्सरग्रस्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने साहजिकच उपचारासाठी रुग्णांचा खाजगीसह शासकीय दवाखान्यांमध्ये धाव घेतली जात आह़े महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांवर कॅन्सरचा उपचार करण्यात येत आह़े त्यातुनच ही आकडेवारीही समोर आली आह़े कॅन्सरवर प्रामुख्याने तीन पध्दतींनी उपचार करण्यात येत असतात़ त्यामध्ये मेडीकल उपचार यात, सर्वप्रथम रुग्णांला औषधींव्दारे इलाज करण्यात येत असतात़ त्यानंतर किर्णोत्सारी उपचार व नंतर अंतीम टप्प्यात कॅन्सर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येत असत़े 2013 ते मार्च 2018 दरम्यान, धुळे जिल्ह्यात सर्वाधिक 10 हजार 723 कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी एक हजार 396 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आह़े जळगाव जिल्ह्यातील सहा हजार 555 कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी एक हजार 410 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार 458 रुग्णांपैकी 275 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणत आली आह़े योजनेबाबत वाढतेय जनजागृती.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेव्दारे कॅन्सरवरील उपचार करण्यात येत आह़े जळगाव धुळे व नंदुरबारात साधारणत 2013 पासून या योजनेला सुरुवात करण्यात आली होती़ कॅन्सरग्रस्त रुग्णांनी घेतलेल्या उपचारांची आकडेवारी पाहता योजना सुरु होण्याच्या सुरुवातीच्या काळात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी होती़ परंतु त्यानंतर योजनेचा प्रसार व प्रचार ब:यापैकी झाल्यानंतर लाभाथ्र्याची संख्याही वाढत गेल्याचे आपणास दिसून येत़े दरम्यान, 2013 पासून कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आह़े शासनाकडून तंबाखूमुक्त शाळा अभियानासारखे अभिनव उपक्रम राबविण्यात येत आह़े त्यामुळे भविष्यातील पिढी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहिल अशी अपेक्षा यामाध्यमातून व्यक्त करण्यात येत आह़े परंतु दुसरीकडे गुटखा बंदी असतानाही सर्वत्र खुलेआम पध्दतीने गुटख्याची विक्री सुरुच आह़े त्यामुळे हीदेखील यात चिंतेची बाब निर्माण झाली आह़े दुर्गम भागात घेतले जाताय शिबिरएकीकडे कॅन्सरचा विळखा वाढत असताना दुसरीकडे मात्र दुर्गम भागात कॅन्सरचा उपचार करण्यासाठी आदिवासी बांधव धजावत नसल्याची स्थिती आह़े आजाराची माहिती इतरांना होईल या भावनेतून घाबरुन अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णांलयांमध्ये येत नसल्याची माहिती मिळाली़ त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना शोधण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात मोठय़ा संख्येने तपासणी शिबीर, कॅम्पचे आयोजन करण्यात येत असत़े जळगाव जिल्ह्यातील उपरार्थ असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या - मेडीकल उपचार पध्दतीमध्ये सन 2013 - 169, 2014 - 536, 2015 - 628, 2016 - 772, 2017 ते 20 मार्च 2018 र्पयत 840 रुग्णांनी उपचार घेतला आह़े तर, किर्णोत्सारी उपचार पध्दतीमध्ये 2013 - 97, 2014 - 408, 2015 - 537, 2016 - 568, 2017 ते 20 मार्च 2018 र्पयत 590 रुग्णांनी उपचार घेतल़े तर 2013 - 96, 2014 - 287, 2015 - 306, 2016 - 354, 2017 ते 20 मार्च 2018 र्पयत 367 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आह़े धुळे जिल्ह्यातील उपरार्थ असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या - मेडीकल उपचार पध्दतीव्दारे सन 2013 - 420, 2014 - 817, 2015 - 1 हजार 262, 2016 - 1 हजार 251, 2017 - 1 हजार 785, 2017 ते 20 मार्च 2018 र्पयत - 2 हजार 360 इतके रुग्णांनी उपचार घेतले आह़े किर्णोत्सारी पध्दतीमध्ये 2013 - 102, 2014 - 189, 2015 - 249, 2016 - 253, 2017 - 278 तर 20 मार्च 2018 र्पयत 361 रुग्णांनी उपचार केले आहेत़ तसेच 2013 - 204, 2014 - 231, 2015 - 197, 2016 - 232, 2017 - 256 तर 20 मार्च 2018 र्पयत 276 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यातील उपरार्थ असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या - मेडीकल उपचार पध्दतीव्दारे सन 2013 - 09, 2014 - 280, 2015 - 381, 2016 - 495, 2017 - 740 व 20 मार्च 2018 र्पयत 234 रुग्णांवर उपचार करण्यात आले आह़े तसेच 2013 - 04, 2014 - 52, 2015 - 45, 2016 - 65, 2017 - 94 तर 20 मार्च 2018 र्पयत 15 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आह़े