लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात पतंगज्वर चांगला चढला पतंगच्या बाजारात मोठय़ा प्रमाणावर उलाढाल झाली. मांजा तयार करण्यासाठी कारागिरांकडे रांगा लागल्या होत्या. दरम्यान, नायलॉन मांजाची विक्री शनिवारी देखील सर्रास सुरूच होती.मकरसंक्रांतीनिमित्त नंदुरबारात पतंगोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू करण्यात आली होती. सुटीच्या दिवशी सकाळी व सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर युवक पतंग उडवितांना दिसून येत होते. गेल्या आठ दिवसांपासून तर बाजारात उलाढाल मोठय़ा प्रमाणावर वाढली होती. त्यातच नायलॉन मांजावर बंदी आणण्यात आल्यानंतर स्थानिक कारागिरांना मांजा बनविण्यासाठी मागणी वाढली.बाजारात चौकाचौकात पतंग विक्रीची दुकाने लावण्यात आली आहेत. अगदी पाच रुपयांपासून 500 रुपयांर्पयतच्या पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात विविध आकार व प्रकारातील पतंगांचा समावेश आहे. साधारणत: 50 हजारांपेक्षा अधीक संख्येने पतंग विक्री होण्याची शक्यता आहे. येथील व्यापा:यांनी बडोदा, अहमदाबाद, सुरत व इंदोर येथील बाजारातून पतंग खरेदी केल्या आहेत.मांजा बनविण्यासाठी गर्दीनॉयलॉन मांजावर बंदी घालण्यात आल्यानंतर स्थानिक कारागिरांकडे पारंपारिक मांजा बनविण्यासाठी गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी तर रांगा लागल्या आहेत. दुकानातून साधा दोराच्या रिळाची खरेदी करून ती कारागिरांकडे दिल्यावर कारागिर मांजा तयार करून देत असतात. मांजा तयार करतांना लाख, काचेचा चुरा, रंग याचा वापर केला जातो. घरगुती पद्धतीने तयार केलेल्या उपकरणावर मांजा तयार केला जातो. दो:याच्या लांबीप्रमाणे अर्थात मिटरप्रमाणे कारागिर मजुरी अकारतो.दरम्यान, नायलॉन दो:यावर बंदी असतांनाही अनेक विक्रेत्यांनी त्याची सर्रास विक्री केली. यामुळे प्रशासनाने ढिलाई दिल्यामुळेच हे शक्य होत असल्याचेही चित्र होते. दुकान निरिक्षक कार्यालयातील कर्मचारी आणि पालिका कर्मचा:यांनी याबाबत सक्त कार्यवाही करणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
संक्रांतीनिमित्त नंदुरबारात चढला पतंगज्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:38 PM