लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विनापरवाना जनावरांची हाडे वाहून नेणा:यांची चौकशी करणा:या पोलीस कर्मचा:यांसोबत चौघांनी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुरुवारी दुपारी धुळे रस्त्यावर हा प्रकार घडला होता़ नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनिल जालिंदर बडे यांना धुळे रस्त्यावर थांबलेल्या एका वाहनातून दरुगधी येत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, एमएच 20 एए 8682 या वाहनातून सार्वजनिक आरोग्य धोका निर्माण करणारी दरुगधी येत होती़ यावेळी त्यांनी वाहनातील शेख इस्माईल शेख इब्राहिम शेख, अफरोज खान, जाबीरभाई कुरेशी, अविब कुरेशी सर्व रा़ औरंगाबाद यांना विचारणा केली़ चौघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाहनाची तपासणी केली असता, त्यात मेलेल्या जनावरांची हाडे आढळून आली़ हाडे वाहून नेण्याचा परवाना नसल्याने चौघांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न कर्मचा:यांनी केला असता, त्यांनी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला़ याप्रकरणी पोलीस नाईक अनिल बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर करत आहेत़ दरम्यान शेख इस्माईल शेख इस्माईल रा़औरंगाबद यांच्याकडूनही शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आह़े त्यानुसार गुरुवारी भूषण पाटील, सागर चौधरी, नयन चौधरी, विराज चौधरी, राकेश चौधरी, विशाल चौधरी सर्व रा़ नंदुरबार यांनी ट्रकचा पाठलाग करुन धुळे रोडवर थांबवला़ गोमास वाहून नेण्याच्या संशयातून वाहन थांबवत सर्व सहा जणांनी शिवीगाळ करुन मारहाण केली़ यादरम्यान वाहनावर दगड मारुन काचा फोडल्याने गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार करत आहेत़ याप्रकरणी पोलीसांनी शेख इस्माईल शेख इब्राहिम शेख आणि अफरोज खान या दोघांनाही अटक केली आह़े वाहनातील हाडांच्या वाहतूकीची पोलीसांकडून चौकशी सुरु असून माहिती घेतली जात आह़े
जनावरांची हाडे वाहून नेणा:यांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:53 PM