लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील विखरण येथे मजूरीच्या वाटपातून झालेल्या वादातून युवकाचा खून झाला होता़ या प्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने एकास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आह़े विखरण येथील संतोष दामू भिल याचा गावातीलच संतोष सदू भिल याच्यासोबत मजूरीच्या पैशांवरून वाद झाला होता़ वादानंतर 29 जुलै 2015 रोजी विखरण गावात जुन मोहिदे रस्त्यावर मित्रांसोबत गप्पा मारणा:या संतोष दामू भिल याच्यावर संतोष सदू भिल याने कोंबडी कापण्याच्या सु:याने वार करून जखमी केले होत़े यात त्याचा मृत्यू झाला होता़ आरोपी संतोष सदू भिल याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सुकमाबाई भिल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दोषारोपपत्र पोलीस उपनिरीक्षक डी़एस़ महिरे यांनी न्यायालयात दाखल केले होत़े सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले होत़े यात दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली व इतर साक्षीदारांनी गुन्ह्यासंदर्भात महत्त्वपूर्ण साक्ष दिल्याने अभियोग पक्षाचा पुरावा मान्य करून जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी आरोपी संतोष सदू भिल यास कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आह़े दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा त्यास देण्यात आली आह़े सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील यशवंतराव मोरे यांनी काम पाहिल़े
विखरण येथील युवकाच्या खून प्रकरणी एकास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 11:57 AM