शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सरपंचांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून केले जप्त

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: April 26, 2023 7:41 PM

नवापूर तालुक्यातील मोठे खातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश जात पडताळणी समितीने दिले आहेत.

मनोज शेलार, नंदुरबार : नवापूर तालुक्यातील मोठे खातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश जात पडताळणी समितीने दिले आहेत.

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठे खातगाव येथील सुमा पारतू वळवी उर्फ सुमा किसन वळवी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेले जातीचे दाखले, जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करून निवडणुकीत उमेदवारी केली. या निवडणुकीत त्या निवडूनही आल्या होत्या. याबाबत खातगाव येथील तेजस्विता शिरीष वसावे यांनी नवापूर तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेले दाखले रद्द करून जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

आदेशात नमूद वस्तुस्थितीवरून सुमा पारतू वळवी यांनी समितीस सादर केलेले भिल, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हे विहीत पद्धतीचा अवलंब करून मिळविलेले नसल्याने तसेच सक्षम प्राधिकारी, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार यांनी सदर अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित केलेले नसल्याने तथाकथित भिल, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. समिती समोर सादर केलेले जमातीचे प्रमाणपत्र विहीत पद्धतीचा अवलंब करून प्राप्त केलेले नसल्याने ते पडताळणीत खोटे व बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सुमा पारतू वळवी यांना समितीमार्फत निर्गमित वैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेशित केले आहे.

त्यांनी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागेवर खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर मिळविलेले वैधता प्रमाणपत्राचा वापर केलेला असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) २०००च्या कलम १० व ११ मधील तरतुदीनुसार कारवाई करावी, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार