लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा येथे बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कत्तलीसाठी व विक्रीसाठी जाणाऱ्या १२ लाख ७० हजार रूपये किमतीचे ६३ गोवंश व तीन गायी धाड टाकून पकडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करून एवढ्या मोठ्या संख्येने गायी व बैल पकडण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना गुप्त माहिती मिळाली होती की, तळोदा शहरातील खटाई माता मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात झाडा झुडपात गोवंश कत्तलीसाठी व विक्रीसाठी आणून बांधलेले आहेत. ही महिती त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांच्या पथकाला सांगितली. या पथकाने २२ जुलै रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास तळोदा पोलीस स्टेशनला जावून पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे यांना या प्रकाराची माहिती दिली.यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व तळोद्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे, पोलीस हे.कॉ.सुनील मोरे, पोलीस नाईक अजय पवार, कमलसिंग जाधव, वनसिंग पाडवी, रवींद्र कोराळे, अनिल पाडवी, दिनेश वसावे, रवींद्र पाडवी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, हे.कॉ.मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनील पाडवी, दादाभाई मासुळे, मनोज नाईक, युवराज चव्हाण, विजय धिवरे, सतीश घुले यांनी संयुक्त कारवाई करत मिळालेल्या माहितीनुसार तळोदा शहरातील खटाई माता मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात झाडा झुडपाच्या ठिकाणी धाड टाकली. त्याठिकाणी त्यांना तीन गायी व ६३ बैल अशी एकूण ६६ जनावरे आढळून आले. त्यांची किंमत साधारपणे १२ लाख ७० हजार रूपये एवढी असल्याचे सांगितले जाते.या जनावरांबाबत अधिक चौकशी केली असता, गोवंश मार्केट कमिटीचा परवाना नसताना कत्तलीसाठी व विक्रीसाठी ही जनावरे आणली असल्याचे समोर आल्याने पो.काँ.अजय कोळी यांच्या फिर्यादीवरून आरोपी रियाज खान रज्जाक खान कुरेशी (३८), शेख मोहसीन शेख सलीम कुरेशी (३४) दोघे रा.कुरेशी मोहल्ला, तळोदा या दोघांविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याचे उल्लंघन करत प्राण्यांना क्रुररतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणाºया कायद्याप्रमाणे मजकुराच्या लेखी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार हे करत आहेतकत्तलखान्यात विक्रीसाठी जाणारे ६३ गोवंश पकडले. या जनावरांना तळोदा तालुक्यातील रांझणी येथील श्री कृष्ण गो शाळेत पाठविण्यात आले आहे.