कावड पदयात्रा प्रकाशाहून निवालीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:37 PM
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तेथील महादेव मंदिरात अभिषेक करण्यासाठी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथून तापी नदीचे जल कावड पदयात्रेद्वारे नेतात.
ऑनलाईन लोकमतशहादा, जि. नंदुरबार, दि. 23- ‘ओम नमो शिवाय’चा गजर करीत प्रकाशा येथून कावड पदयात्रा शनिवारी निवालीकडे रवाना झाली.मध्य प्रदेशातील निवाली येथील भाविक गेल्या पाच वर्षापासून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तेथील महादेव मंदिरात अभिषेक करण्यासाठी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथून तापी नदीचे जल कावड पदयात्रेद्वारे नेतात. यंदाही मुखी महाराज, रेमा महाराज, सुरेश महाराज, ग्यानसिंग महाराज, गंगाराम महाराज, शिवराम महाराज, काशीराम महाराज, चंपाबाई यांच्यासह भाविक तीन दिवस कावड पदयात्रेद्वारे प्रकाशा येथे आले. शनिवारी पहाटे तापी नदीत भाविकांनी ब्रrास्नान करून काशीविश्वेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ‘ú नमो शिवाय’चा गजर करीत निवालीकडे ही पदयात्रा निघाली. सोमवारी निवाली येथील महादेव मंदिरात जल अभिषेक करण्यात येणार आहे.