शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सीसीटीव्हीचे जाळे आणखी विस्तारणार : नंदुरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:21 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात सीसीटीव्ही कॅमे:यांचे जाळे अधिक विस्तारण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून निधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, सद्यस्थितीत 30 कॅमेरे सुरू असून सध्याचा कंट्रोल रूम हा पोलीस मुख्यालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.  कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून नंदुरबार शहर हे शासन दप्तरी संवेदनशील म्हणून नोंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात सीसीटीव्ही कॅमे:यांचे जाळे अधिक विस्तारण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून निधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, सद्यस्थितीत 30 कॅमेरे सुरू असून सध्याचा कंट्रोल रूम हा पोलीस मुख्यालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.  कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून नंदुरबार शहर हे शासन दप्तरी संवेदनशील म्हणून नोंद आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमे:यांचीही नजर राहत आहे. त्याचा चांगला परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात शहरात आणखी 100 ते 150 कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोलरूमचेही स्थलांतर पोलीस मुख्यालयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सध्याचे कॅमेरे अपुर्णसध्या असलेले 30 कॅमेरे पुरेसे नसल्याची स्थिती आहे. असे असले तरी सर्वच मुख्य चौक, मुख्य मार्ग आणि संवेदनशील भागात हे कॅमेरे कार्यान्वीत आहेत. त्याद्वारे नजर ठेवून घडणा:या घटना किंवा घडलेल्या घटनांवर लागलीच नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना वेळोवेळी यश आले आहे. सध्याचे कॅमेरे हे शहरातील मुख्य भागातच असल्यामुळे इतर ठिकाणची स्थितीचे अवलोकन या माध्यमातून होत नाही. ही बाब लक्षात घेता संख्या वाढविण्यात येणार आहे.विस्तार वाढविणारसध्या असलेले कॅमेरे हे मुख्य चौक, संवेदनशील चौक, संमिश्र वस्ती आणि मुख्य मार्गावर कार्यान्वीत आहेत. परिणामी शहरातील इतर भागावर नजर ठेवतांना पोलिसांना पेट्रोलिंगसह साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी लागते. शिवाय कॉलनी भागात भुरटय़ा चो:यांचे सत्र थांबविण्यात देखील अडचण येते. ही बाब लक्षात घेता आणखी 100 ते 150 कॅॅमेरे लावण्याचे नियोजन पोलीस विभागाचे आहे. त्यासाठी जिल्हाधिका:यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन व विकास समितीकडे देखील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे. लवकरच हे कॅमेरे कार्यान्वीत होतील अशी अपेक्षा आहे.यापुढे कॅमेरे घेतांना रात्रीच्या वेळ देखील सुस्पष्ट चित्रीकरण होईल या दर्जाचे कॅमेरे घेण्याची अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. दुरूस्तीसाठी निधी हवासीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी डीपीडीसीमार्फत निधी उपलब्ध होतो, परंतु त्यांच्या दुरूस्तीसाठी मात्र निधी राहत नसल्याची स्थिती आहे.   नैसर्गिक कारणांमुळे कॅमेरे तुटले   किंवा खराब झाले, कुणी मुद्दाम   त्यांची तोडफोड केली तर असे कॅमेरे अनेक दिवस दुरूस्त होत नाहीत. परिणामी ते निकामी होतात. त्यामुळे कॅमेरे खरेदी करतांना आणि   लावतांना त्यांच्या दुरूस्तीसाठीच्या निधीचीही तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.