शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नंदुरबार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीचा प्रस्ताव धुळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:11 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या 2 वर्षापासून नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी धुळखात पडला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या 2 वर्षापासून नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी धुळखात पडला आह़े  पश्चिम रेल्वेला अद्याप नंदुरबार रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सवळ मिळत नसल्याने स्थानिक रेल्वे प्रशासन व प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत         आह़ेरविवारी चैन्नई-जोधपूर रेल्वेत घातपाती कृत्य घडवून आणण्याची गुप्त माहिती उघड झाली होती़ त्यामुळे साहजिकच घटनेचे गांभीर्य ओळखत नंदुरबार स्थानकावर येण्यापूर्वी सदर रेल्वेची दोंडाईचा येथे धुळे व नंदुरबार बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली होती़ तथापि, रेल्वेत घातपाती कृत्य घडवून आणण्याची ही अफवा असल्याचे लक्षात आल़े असे असले तरीदेखील यामुळे रेल्वे व रेल्वे स्थानक या दोहोंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आह़े त्यामुळे नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा ‘लोकमत’तर्फे आढावा घेण्यात आला़ नंदुरबार हे पश्चिम रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक आह़े या ठिकाणी प्रवासी रेल्वे वाहतूक कमी असली तरी मालवाहू रेल्वे गाडय़ांची येथून मोठय़ा संख्येने ये-जा असत़े गेल्या दोन वर्षापासून नंदुरबार रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे असा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाकडून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला होता़ स्थानकाच्या पाहणी दौ:यावर आलेले जनरल मॅनेजर यांनाही याबाबत सांगण्यात आले होत़े परंतु अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत कुठलीही हालचाल झाली नाही़ तसे पाहता नंदुरबार रेल्वे स्थानक हे अत्यंत संवेदनशिल स्थानक आह़े या ठिकाणी अपहरण, चोरीच्या घटना या आधी वेळोवेळी घडत आलेल्या आहेत़ त्यामुळे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीनेही या ठिकाणी कॅमेरे बसविणे अत्यंत गरजेचे आह़े परंतु वरिष्ठ प्रशासनाकडून वारंवार याबाबत चालढकल करण्यात येत असल्याने रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेप्रती गंभीर नसल्याचा आरोप होत आह़े नंदुरबार रेल्वे स्थानकावर एकाही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही़ त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनाही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असत़े अनेक गुन्ह्यांची उकल ही सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून झाल्याचे  वास्तव आह़े त्यामुळे कुठलाही गुन्हा घडल्यास सर्वप्रथम संबंधित क्षेत्रातील सीसीटीव्हींची तपासणी करण्यात येत असत़े यातून पोलीस व तपासी अधिका:यांना मोठी मदत होत असत़े त्यामुळे रेल्वे पोलिसांकडूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला जात आह़े परंतु याची दखल घेतली न गेल्याने तेसुध्दा हताश झालेले आह़ेरेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही नसल्याने रेल्वे पोलीस कर्मचा:यांना जागोजागी आपले खबरी ठेवावे लागत आह़े स्थानकावर संशयितरित्या हालचाली असलेल्या संबंधित व्यक्तीची माहिती हे खबरी तत्काळ पोलिसांना कळवत असतात़ त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्थानकावर सीसीटीव्हीची व्यवस्था केल्यास स्थानकाची सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याचे सांगण्यात येत         आह़े रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही शिवाय अन्य सुरक्षा व्यवस्थाही गरजेची आह़े या ठिकाणी मोठय़ा प्रमात भटकी श्वान फिरत असता़ त्यामुळे प्रवाशांना यातून धोका निर्माण होण्याची शक्यता आह़े रेल्वे तिकीट खिडकीजवळ मोकाट श्वानांची रेलचेल असत़े त्यामुळे अनेक वेळा श्वान दंशाचे प्रकारही घडलेले आहेत़ स्थानिक रेल्वे प्रशासनाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़े अनेक वेळा रेल्वे रुळावरही गाय, बकरी तसेच श्वान असतात़