शहादा, शिरपूर, नंदुरबार, निझर (गुजरात) तालुक्यातही नदीचे विधीवत पूजन करण्यात आले. अनेक वर्षांपासून ही अनोखी प्रथा जिल्ह्यात आहे. पुराणात तापी नदीचे महात्म्य सांगितले असून, आषाढ शुद्ध सप्तमी हा तापीचा जन्मदिवस मानला जातो. मध्य प्रदेशातून तापी नदी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अजनाड येथे प्रवेश करते. तिचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अजनाड येथे तापीची विधीवत पूजा करून खणा-नारळाने ओटी भरून जन्मोत्सव साजरा केला जातो. शेल्टी, ता. शहादा येथेही ग्रामस्थ व महिलांनी रामधून म्हणत भावफेरी काढली आणि मोठ्या संख्येने तापीमातेची प्रतिमा, पाण्याने भरलेला घट व साडी-खण, नारळ, तापी पुराण ग्रंथ यांची शोभायात्रा काढण्यात आली. नंतर नदीवर जाऊन तापीची षोड्शोपचार पूजा करण्यात आली. महाआरती करून तापीला ग्राम जोडपे यांच्या हस्ते साडीचोळी अर्पण केली आणि जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
शेल्टी येथे सूर्यकन्या तापी माता जन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:24 AM