प्रतापपूर : तळोदा तालुक्यात 1934 साली सिलींगपूर येथे एसए चर्चची स्थापना करण्यात आली होती़ ग्रामीण भागातील पहिले चर्च असल्याने याठिकाणी गत 86 वर्षापासून येथे नाताळ उत्सव साजरा करण्यात येतो़ विशेष म्हणजे येथील नोकरीनिमित्त बाहेर स्थिरावलेले येथील मूळनिवासी न चुकता नाताळसाठी घरी येतात़ यामुळे आठ दिवसआधीपासून येथे चैतन्य संचारत़े 86 वर्षापूर्वी स्वीडन येथून आलेल्या मिशनरींनी सिलींगपूर चर्चची स्थापना केली होती़ तत्पूर्वी गावात ािस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला होता़ येथील ािस्ती बांधव विविध उपक्रमांसाठी तळोदा आणि नंदुरबार येथे जात होत़े यामुळे याठिकाणी चर्च स्थापन करुन त्याचे बांधकाम करण्यात आल़े रोमन पद्धतीने बांधकाम करण्यात आलेल्या या चर्चमध्ये प्रार्थना करणे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आह़े पूर्वी असलेले लाकडी छताचे नूतनीकरण करण्यात आले होत़े दरवर्षी नाताळच्या पूर्वी या चर्चची रंगरंगोटी करण्यात येत़े नाताळच्या पाश्र्वभूमीवर या चर्चवर यंदाही आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आह़़े परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थ नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी याठिकाणी हजेरी लावत असल्याने सामाजिक सलोखाही जपला जात आह़े यंदा रोषणाईसोबतच आकर्षक कागदी पताका लावण्यात येऊन अनेक वर्षापासून संगोपन करण्यात आलेल्या विविध फुलझाडे आणि फुलांच्या वेलींची विशिष्ट सजावट करण्यात आली आह़े ही सजावट येथे येणा:या भाविकांचे लक्ष वेधून घेत आह़े याठिकाणी रविवारपासून कार्यक्रम सुरु झाले आहेत़ यात गीत गायनासह नाटिकांचे सादरीकरण तरुणसंघ आणि बच्चे कंपनीकडून करण्यात येत आह़े 24 रोजी येथे सकाळी आठ वाजेपासून कार्यक्रमांना सुरुवात होणार रात्री 12 वाजता येशू जन्माचा कार्यक्रम करण्यात येऊन प्रार्थना होणार असल्याचे सॅमसन जयकर यांनी सांगितल़े
86 वर्ष जुन्या सिलींगपूरच्या एसए चर्चमध्ये सुरु झाला नाताळचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:42 AM