लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खुर्चीमाळ येथे गेल्या आठ दिवसापासून वीजपुरवठा खंडित आहे. खुर्चीमाळ येथे दऱ्या खोºयाच्या डोंगराळ भागातून १८ ते २० किलोमीटर अंतरावरील जमाना सबस्टेशनवरून वीज पुरवठा करण्यात येत असून, कायमच कुठे तरी बिघाड होत असतो व बिघाड झाल्यास गावातीलच दोन तरूण जमाना सबस्टेशनला जाऊन सुचीत करीत असतात. तर दुसरे तरूण बिघाड शोधून दुरूस्ती करीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात.जमाना ऐवजी नवलपूरवरून वीज जोडणी झाल्यास दºया खोºयातील चढउताराचे डोंगराळ भागातील १८ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते दोन किलोमीटर अंतरावर येवून कमी अंतरावरील बिघाड लवकर शोधून विजपुरवठा सुरळीत होईल.जमाना सबस्टेशनवर वीज जोडणी असल्याने माळच्या पाड्यांवर बारा महिन्यात वीज कधी आली तर आली नाहीतर मग कायमच गायब असते. माळ, डोगरीपाडा (माळ), माळ (पाटिलपाडा), कुंभरीपाडा (माळ), सोजरबारपाडा (माळ), डोंगरीपाडा (माळ), बिलिगव्हाणपाडा (माळ) यांना कायम अंधारातच रहावे लागत असून, बिलिगव्हाणपाडा माळ येथे विजेचे पोल, केबलही अद्यापपर्यत टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे या पाड्यांवर कायम अंधाराचे साम्राज्य आहे.एखाद्या वेळेस गर्भवती महिलेला अथवा रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी मोबाईलची गरज पडते. मात्र विजेअभावी मोबाईल चार्ज नसल्याने मोठी अडचण निर्माण होत असते. अतिदुर्गम भाग असल्याने अस्वल, वाघ या सारख्या जंगली प्राण्यांपासून धोका अधिक आहे. त्यामुळे विजेची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.जमाना सबस्टेशनवरून पाटबारा, ओरपा, डाबोसापडा (ओरपापाडा), नेदवान बुद्रूक अशी करीत दºया खोºयातून १८ ते २० किलोमीटर अंतर करीत खुर्चीमाळ, उबराईपाडा (खुर्चीमाळ), हागोबारपाडा (खुर्चीमाळ), कारभारीपाडा (खुर्चीमाळ) मार्गे वीज येत असल्याने विजेच्या बिघाड शोधण्यासाठी अडचणी निर्माण होत असते. त्यामुळे पुढे खुर्चीमाळहून माळ (पाटीलपाडा), कुंभरीपाडा (माळ), सोजरबारपाडा (माळ), डोंगरीपाडा (माळ), बिलिगव्हाणपडा (माळ) येथेही विजेच्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीतच असतो. बिलिगव्हाणपाडा येथे विजेचे खांब व केबलअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झााले आहे. त्यामुळे जमाना सबस्टेशनऐवजी नवलपूर (अलिविहीर) येथे वीज जोडणी झाल्यास १८ किलोमीटरचे अंतर कमी होवून दोन किलोमीटरवर येईल. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.या पाड्यावरील नाागरीकांना विजेअभावी टीव्ही, पिठाची गिरणी व विजेच्या उपकरणाचा उपयोग करता येत नाही. तसेच येथील नागरीकांना अद्यापपर्यत टीव्ही काय आहे हे माहीत नसल्याची खंत व्यक्त करीत व मोबाईल अक्कलकुवा येथे जावून १० रूपये देवून चार्जीग करून घ्यावा लागतो.
तरूणांच्या सजगतेने खुर्चीमाळ होते प्रकाशमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:42 PM